
नाशिक : पंचवटीतील जाणता राजा कॉलनीमध्ये भरधाव बोलोरोच्या धडकेत १४ वर्षांचा सायकलस्वार मुलगा ठार झाल्याची घटना घडली. संशयित वाहनासह पसार झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात वाहनचालकांविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cyclist boy killed in collision with Bolero nashik Latest Marathi News)
साई मोहन देशमुख (१४, रा. साईराम कॉम्प्लेक्स, देवी मंदिरासमोर, मखमलाबाद रोड, पंचवटी), असे अपघातामध्ये ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. कमलेश प्रकाश देशमुख (रा. शिंदेनगर, कॅनॉल रोड, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. १०) साई हा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सायकलवरून घराकडे जात होता.
त्या वेळी जाणता राजा कॉलनीमध्ये पाठीमागून भरधाव बोलेरो चारचाकी वाहनाने (एमएच- ३९- जे- ३४१४) जोरात धडक दिली. या अपघातामध्ये साईच्या डोक्याला, पोटाला गंभीर जखम झाल्याने त्याच मृत्यू झाला.
तर संशयित वाहनचालक अपघातस्थळी न थांबता तेथून पसार झाला. याप्रकरणी संशयित वाहनचालक सम्राट चंद्रकांत पगारे (२७, रा. कळमधारी, ता. नांदगाव) याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक वाय.एस. माळी हे पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.