नाशिक- निकाल जाहीर होऊन एक महिना उलटल्यावर बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला आहे. विविध अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी सायंकाळी उशिरापर्यंत डी. फार्मसी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झालेले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांकडून मनस्ताप व्यक्त होत आहे. विनाविलंब औषधनिर्माणशास्त्र शाखेचे प्रवेश सुरू करण्याची मागणी होत आहे.