Dada Bhuse News : एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही : भुसे

Guardian Minister Dada Bhuse along with Sarpanch Shobha Boraste while inspecting the damaged vineyards
Guardian Minister Dada Bhuse along with Sarpanch Shobha Boraste while inspecting the damaged vineyards esakal

Nashik Dada Bhuse News : अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) नुकासन झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. द्राक्षपिकासह शेतीच्या नुकसानीबाबत शासन गंभीर असून, वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सुचना महसुल व कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. (dada bhuse statement about No farmer will be deprived of assistance unseasonal rain nashik news)

एकही शेतकरी मदतीपासुन वंचित राहणार नाही. अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे (dada bhuse) यांनी दिली. शनिवारी (ता. १५) गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री भुसे यांनी रविवारी (ता. १६) साकोरे मीग (ता. निफाड)येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतली.

प्रांताधिकारी शुभांगी पाटील, तहसिलदार शरद घोरपडे, सरपंच शोभा बोरस्ते या वेळी उपस्थित होते. मंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधुन आस्थेवाईकपणे त्यांची चौकशी केली. रामभाऊ बोरस्ते, रामनाथ बोरस्ते, उत्तम बोरस्ते, संपत बोरस्ते, ज्ञानेश्‍वर बोरस्ते आदी बहुतांश शेतकऱ्यांच्या निर्यातक्षम व काढणीला आलेल्या द्राक्षघडांना शनिवारच्या गारपीटीने जोरदार तडाखा दिला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Guardian Minister Dada Bhuse along with Sarpanch Shobha Boraste while inspecting the damaged vineyards
Unseasonal Rain Nashik : बागलाण, मालेगावला बेमोसमी पावसाने दाणादाण; कांद्याचे मोठे नुकसान

व्यापाऱ्यांशी झालेले सौदे मोडीत निघाल्याने शतकरी हतबल झाला आहे. कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, अशी कैफियत मंत्री भुसे यांच्यापुढे शेतकऱ्यांनी हताशपणे मांडली. शेतकऱ्यांना दिलासा देताना श्री. भुसे म्हणाले, की नैसर्गिक आपत्तीकडे शासनाचे अजिबात दुर्लक्ष नाही. द्राक्ष उत्पादकांना भरिव मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

टपोऱ्या गारांनी निर्यातक्षम द्राक्षांची धुळधाण

साकोरे मीग हे गाव निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. बहुतांश द्राक्ष काढणी झालेली असली, तरी अद्याप २५ टक्के बागांमध्ये द्राक्षांचे घड लगडलेले आहेत. निर्यातीच्या प्रतिक्षेत असलेल्या या द्राक्षांसाठी शनिवारची सायंकाळ कर्दनकाळ ठरली.

अर्धा तास सुरू असलेला टपोऱ्या गारांच्या माऱ्याने परदेशात जाण्यासाठी सज्ज असलेली ही द्राक्षे आता स्थानिक बाजारातही विकण्यायोग्य राहिलेली नाही. द्राक्षमण्यांना तडे गेले असुन, मण्याचा सडा बागेत पडला आहे.

Guardian Minister Dada Bhuse along with Sarpanch Shobha Boraste while inspecting the damaged vineyards
Unseasonal Rain Crop Damage : अवकाळीने कांदा काढणी लांबणीवर; कांदा जमिनीत सडण्यास सुरवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com