Dada Bhuse : कांदा टोमॅटो उत्पादकांसाठी दिलासादायक निर्णय : दादा भुसे

Dada Bhuse
Dada Bhuseesakal

Dada Bhuse : वाढलेली आवक, उन्हाचा तडाखा आणि गुजरातमधील थंडावलेली निर्यात यामुळे जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादकांना फटका बसला आहे. अशातच आता अवकाळी पावसाची टांगती तलवार कायम आहे.

त्यामुळे लवकरच कांद्याप्रमाणे टोमॅटो उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णय घेईल, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज येथे सांगितले. (Dada Bhuse statement Comforting decision for Onion Tomato Growers nashik news)

जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी उत्पादकांशी चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री भुसे बोलत होते. ते म्हणाले, कांदा व टोमॅटो या दोघांचे दर सध्या कोसळले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा मोठ्या प्रमाणावर भिजला होता.त्यामुळे कांदा खराब झाला आहे. चाळीत साठवलेला चांगला कांदाही आता वाढत्या उन्हामुळे खराब होत असून काही ठिकाणी ४० ते ४३ डिग्री तापमान आहे.

टोमॅटोची गेल्या चार ते पाच दिवसात मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. १० मेस नाशिक बाजार समितीत ९५२ क्विंटल टॉमेटोची आवक झाली होती. नंतर ती हळूहळू वाढत आता थेट ६ हजार क्विंटलवर गेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dada Bhuse
Dada Bhuse : रोजगार हमीच्या प्रत्यक्ष कामांची संख्या वाढवा : दादा भुसे

नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गुजरातमध्ये टोमॅटो जात होता. पण सध्या उन्हाळी सुट्या व स्थानिक स्तरावर टोमॅटोचे झालेले मोठे उत्पादन यामुळे कांदा निर्यात देखिल मंदावली आहे. परिणामी कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे दर कोसळले आहेत.

गेल्या महिन्याभरात नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात किती व कोणत्या दराने टोमॅटो विक्री झाली याची माहिती घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर याबाबतचा सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाईल, त्यानंतर टोमॅटो उत्पादकांना काय व कसा दिलासा देता येईल, याबाबत निर्णय घेऊ, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

Dada Bhuse
Nashik News : जिल्हा बँकेच्या मदतीसाठी गोडसे यांचे केंद्रीय सहकार मंत्र्यांना साकडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com