Dada Bhuse: स्मारकासाठी निधी कमी पडून देणार नाही : दादा भुसे

मालेगावला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पायाभरणी
Dr. Bharat Ratna of National Integration Chowk in Malegaon. Guardian Minister Dada Bhuse along with office bearers and activists on the occasion of foundation laying ceremony of Babasaheb Ambedkar Statue
Dr. Bharat Ratna of National Integration Chowk in Malegaon. Guardian Minister Dada Bhuse along with office bearers and activists on the occasion of foundation laying ceremony of Babasaheb Ambedkar Statue esakal

Malegaon News : शहरातील राष्ट्रीय एकात्मता चौकात दोन कोटी रुपये खर्चून साकारणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व स्मारक शहरवासीयांना अभिमान वाटेल असे असेल. हा पुतळा शास्त्रशुद्ध पद्धतीने व भव्य स्वरूपात साकारणार आहे.

या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे दिले.

एकात्मता चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणीचा प्रारंभ श्री. भुसे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. (Dada Bhuse statement Funds for memorial will not fall short nashik)

श्री. भुसे म्हणाले, की या पुतळ्याच्या कामात राजकारण, जात, पात, धर्मकारण काही आणू नये. पुतळ्याच्या कामासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

माजी नगरसेवक राजेश गंगावणे यांनी पुतळा व स्मारकाची माहिती देताना या पुतळ्यासाठी फार संघर्ष करावा लागला. अखेर हे स्वप्न साकार होणार आहे. पुतळ्याचा चबुतरा ३३ फूट असेल. चबुतऱ्यावर १३ फूट उंचीचा पुतळा असेल असे त्यांनी सांगितले.

भन्ते दीपंकर यांनी पूजा केली. पायाभरणी समारंभाप्रसंगी श्री. भुसे यांच्यासह पाच जोडप्यांच्या हस्ते सिमेंट कॉँक्रिट मिक्स टाकून कामाची सुरुवात करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dr. Bharat Ratna of National Integration Chowk in Malegaon. Guardian Minister Dada Bhuse along with office bearers and activists on the occasion of foundation laying ceremony of Babasaheb Ambedkar Statue
Nashik Water Crisis: विंचूरकरांची पाण्यासाठी वणवण सुरूच; सोळागाव पाणी योजनेचे काम ठप्प

यावेळी माजी उपमहापौर सखाराम घोडके, माजी नगरसेविका पुष्पा गंगावणे, शिवसेनेचे महानगरप्रमुख विनोद वाघ, प्रमोद पाटील, कैलास येशीकर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भारत जगताप, तालुकाध्यक्ष दिलीप आहिरे,

भारत चव्हाण, भगवान आढाव, मधुकर केदारे, आनंदा महाले, रवींद्र पवार, भारत म्हसदे, विकास केदारे, विकास अहिरे, अशोक गायकवाड, पिंटू आहिरे, राजू आहिरे, युवराज वाघ, संजय वाघ, विकास अहिरे, किशोर बच्छाव आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Dr. Bharat Ratna of National Integration Chowk in Malegaon. Guardian Minister Dada Bhuse along with office bearers and activists on the occasion of foundation laying ceremony of Babasaheb Ambedkar Statue
Nashik News: कळवणला साकारतोय अद्ययावत जॉगिंग ट्रॅक! 22 कोटी रुपये मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com