Dada Bhuse : ग्रामसेवकांना ग्रामविकासाची मोठी संधी : दादा भुसे

Guardian Minister Dada Bhuse speaking on the occasion of distribution of Adarsh ​​Gram Sevak Award on Monday.
Guardian Minister Dada Bhuse speaking on the occasion of distribution of Adarsh ​​Gram Sevak Award on Monday.esakal

Dada Bhuse : ग्रामसेवक हा गावपातळीवर सरकारचा महत्त्वाचा दुवा आहे. केंद्र व राज्य शासनाच्या १५५ हून अधिक योजनांची अंमलबजावणी ग्रामसेवक करत असतात. हे काम आव्हानात्मक आहे.

परंतु ग्रामसेवकांसाठी ग्रामविकासाची खूप मोठी संधी आहे. ग्रामविकासातून भारताला महासत्ता बनवणे शक्य असल्याचे मत पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. तसेच पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य यावर लक्ष केंद्रित करून आदर्श गावे उभी करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी ग्रामसेवकांना केले. (Dada Bhuse statement Gram sevaks have big opportunity for village development nashik news)

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे गत पाच वर्षांतील आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण कालिदास कलामंदिरात सोमवारी (ता. ८) पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते झाले. प्रातिनिधिक स्वरूपात पाच ग्रामसेवकांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल अध्यक्षस्थानी होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष संजीव निकम, राज्य सचिव सूचित घरत, जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, रवींद्र शेलार, अरुण आहेर, बापू आहिरे आदी उपस्थित होते.

दादा भुसे म्हणाले, जिल्ह्यात १२६ शाळा मॉडेल स्कूल होणार असून, शाळांचे मॉडेल महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असणार आहे. यात ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामसेवकांनी आदर्श गाव तयार करून नाशिक जिल्हा राज्यात आदर्श गावे असलेला जिल्हा बनवावे, असेही पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

आशिमा मित्तल म्हणाल्या, आगामी काळात ग्रामसेवकांनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये मॉडेल व्हिलेज संकल्पना राबवावी. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रत्येकाने काम करावे, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Guardian Minister Dada Bhuse speaking on the occasion of distribution of Adarsh ​​Gram Sevak Award on Monday.
Asaduddin Owaisi : पंतप्रधानांनी चित्रपटाचा प्रचार करणे दुर्दैवी; असदुद्दीन ओवैसी यांची टीका

कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, वर्षा फडोळ, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, माध्यमिकचे प्रवीण पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी मयूरी झोरे, कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे, पंकज मेतकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे,

सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी नितीन पवार, स्टीव्हन शाहबद्री, राजेश वावडे, दिनेश टोपले, हेमंत कोठावदे, विश्वजित पाटील, विलास गांगुर्डे, दीपक साळवे, अशोक अहिरे, योगेश बोराडे, सारिका दिवेकर, रूपाली शेवाळे, वृषाली चौधरी, गीतांजली कोल्हे, सीमा पावरा आदींनी परिश्रम घेतले.

पालकमंत्र्यांनी टोचले ग्रामसेवकांचे कान

दरम्यान, पालकमंत्री भुसे यांनी ग्रामसेवकांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देताना त्यांचे चांगलेच कान देखील टोचले. चांगले काम करणारे ग्रामसेवक आहेत, मात्र गावात न जाणारे ग्रामसेवकदेखील आहे.

काही ग्रामसेवक सरपंचाला धाब्यावर बसून स्वाक्षरी करून, तर काहीजण कोठेतरी बसून ग्रामविकासाचा गाडा हाकतात, असे सांगत भुसे यांनी अशा ग्रामसेवकांनी कामात सुधारणा करावी, असे सांगितले.

पार्किंगमध्ये अडकला रुग्ण

पुरस्कारासाठी जिल्हाभरातील ग्रामसेवकांसह त्यांच्या आप्तेष्टांनी गर्दी केली होती. जिल्ह्यातून आलेल्या ग्रामसेवकांनी बी. डी. भालेकर ग्राउंडवर वाहनांची मिळेल त्या जागेवर पार्किंग केली. कोठेही वाहन लावून दिल्याने येथील सामान्यांची वाहने काढण्यास मोठी अडचण झाली.

यातच एका कुटुंबात रुग्ण तपासणीसाठी घेऊन आले होते. मात्र, वाहन अडकवून बसल्याने हे वाहन अडकून बसले. सदर अडकलेल्या वाहनचालक यांनी कार्यक्रमात येऊन वाहन हटविण्याची विनंती केली.

मात्र, वारंवार विनंती करूनदेखील वाहन हलविले जात नसल्याने संबंधितास रडू कोसळले. अखेर आयोजकांनी वाहन हटविल्याशिवाय कार्यक्रम न घेण्याची कठोर भूमिका घेतली. त्या वेळी ते वाहन हलविले गेले.

Guardian Minister Dada Bhuse speaking on the occasion of distribution of Adarsh ​​Gram Sevak Award on Monday.
Onion Rates Hike : पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची बंपर आवक! सरासरी 900 रूपये भाव

...यांचा झाला आदर्श ग्रामसेवकांनी सन्मान

बापू पवार, रामदास इंगळे, अलका तरवारे, ज्ञानेश्वर जाधव, प्रमिला खंबाईत, रतन बारवरकर, गणेश भोई, साहेबराव देवरे, जयश्री निकम, सीमा समशेर, एकनाथ बोरसे, भगवान जाधव, बाळनाथ बोराडे, दिनकर कुमावत,

वनिता वर्पे (२०१८). उत्कर्ष पाटील, संभाजी मारकंडे, मनोहर गांगुर्डे, भारती देशमुख, मनोहर गायवन, बाळासाहेब पाटील, सुवर्णा दळवी, राहुल नांद्रे, पूनम सोनजे, विशाल सोनवणे, दीपाली गोसावी, साहेबराव बोरसे, प्रदीप बोडके, शीतल सनेर, जालिंदर वाडगे (२०१९ ). ज्ञानेश्वर भोर, गणेश मोढे, किशोर मराठे,

प्रवीण सुरसे, राजेंद्र चौधरी, रमेश राख, अनिल न्हायदे, सुवर्णा भामरे, उत्तम खैरनार, आम्रपाली देसाई, बापू भामरे, युवराज निकम, गोपीचंद खैरे, भालचंद्र तरवारे, संदीप देवरे (२०२०). योगेश पगार, सुरेखा चव्हाण, सुवर्णा बोरसे,

नंदू गायकवाड, पद्मा देशमुख, अनंत जेट्टे, वैशाली देवरे, अमोल देवरे, अनिल आहेर, प्रतिभा पाटील, रमेश द्यानद्यान, नंदकिशोर अमृतकर, सतीश सोनवणे, संदीप पाटील, माधव यादव (२०२१). प्रतिभा घुगे, संतोष हाडंगे,

संदीप महाजन, मनोज आहिरराव, चंद्रकांत चौधरी, राजश्री सनेर, रामराव महाजन, दिनेश कापडणीस, रूपेश आहेर, पुष्पा भोये, सरला पगार, रवींद्र काकळीज, विशाल करवडे, जंगम ज्योर्तिलिंग, प्रमोद शिरोळे (२०२२).

विस्तार अधिकारी : अण्णा किसन गोपाळ, जगन्नाथ सोनवणे, कैलास गादड, श्रीधर सानप, जयवंत भामरे, काशीनाथ गायकवाड

Guardian Minister Dada Bhuse speaking on the occasion of distribution of Adarsh ​​Gram Sevak Award on Monday.
Kharif Review Meeting : पाऊस लांबल्यास खरीप पीक पेरणीत बदल : दादा भुसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com