Dada Bhuse | मालेगाव एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानदानाबरोबरच संस्कृती जोपासण्याचे काम : दादा भुसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dada Bhuse while inaugurating Malegaon Education Society's Amrit Mahotsavi

Dada Bhuse | मालेगाव एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानदानाबरोबरच संस्कृती जोपासण्याचे काम : दादा भुसे

मालेगाव (जि. नाशिक) : मालेगाव एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमुळे मालेगावचे वैभव असलेला भुईकोट किल्ला सुरक्षित आहे. सोसायटीने ज्ञानदान बरोबरच संस्कृती जोपासण्याचे काम केले. या संस्थेचा पंचक्रोशीला अभिमान आहे. राजकारण विरहीत संस्थेचे कामही अभिमानास्पद आहे. यामुळेच या संस्थेतून आजवर सुमारे ६० हजार सुसंस्कृत राष्ट्र, राज्य व शहर विकासाला हातभार लावणारे विद्यार्थी घडले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. ७) येथे केले. (Dada Bhuse statement Malegaon Education Society work to cultivate culture along with imparting knowledge)

मालेगाव एज्युकेशन सोसायटीच्या दोन दिवसीय अमृत महोत्सवी सोहळ्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. सुभाष भामरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब ऊर्फ सुरेश जाधव, व्याख्याते प्रकाश पाठक, अमृत महोत्सवी समितीचे अध्यक्ष रवींद्र दशपुते, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विलास पुरोहित, सचिव सतिश कलंत्री, विश्‍वस्थ नितीन पोफळे, सोसायटी अध्यक्ष ॲड. प्रकाश दातार, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोहर कासार, विद्यार्थिनी संघाच्या अध्यक्षा गीतांजली बाफणा आदींसह सर्व संचालक होते.

श्री. भुसे म्हणाले, की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व शाळेचा अमृत महोत्सव एकाच वेळी साजरा होतो हा योगायोग आहे. येथील भुईकोट किल्ल्याला पूर्ववैभव निर्माण करून देण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू. शहरात आगामी वर्षात आपणाला भौतिक व सांस्कृतिक बदल जाणवतील. या संस्थेचा तालुक्यासह पंचक्रोशीत विस्तार व्हावा अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik News : दिवंगत महिला जवान गायत्री जाधवांच्या कुटुंबीयांचे छगन भुजबळांकडून सांत्वन

श्री. पाठक म्हणाले, की शिक्षकांची व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणारा हा सोहळा आहे. कृतार्थ समाजाला वंदन करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थी येथे आले. पायातील दगड भक्कम असल्यास इमारत डौलाने उभी राहते.

आजचा सोहळा त्याची साक्ष देतो. राष्ट्र उन्नत असते ते शिक्षकांमुळेच. अशा शिक्षकांचा गुणगौरव होणार आहे ही अभिमानाची बाब आहे. शिक्षण संस्कार घडवितात. शिक्षण म्हणजे दळण नव्हे तर वळण लावण्याचे काम आहे. या संस्थेने हे काम चोखपणे केले आहे.

डॉ. भामरे यांनीही मार्गदर्शन केले. श्री. दशपुते यांनी प्रास्ताविक केले. सोहळ्यास सुमारे तीन हजारहून अधिक माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते

हेही वाचा: Nashik News : दिंडोरीत आजी- माजी आमदारांनी उघडली कार्यालये; नागरिकांना मात्र हवीय विकासकामे

टॅग्स :Nashikdada bhuse