Nashik News : दिवंगत महिला जवान गायत्री जाधवांच्या कुटुंबीयांचे छगन भुजबळांकडून सांत्वन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Chhagan Bhujbal while questioning the family of deceased Gayatri.

Nashik News : दिवंगत महिला जवान गायत्री जाधवांच्या कुटुंबीयांचे छगन भुजबळांकडून सांत्वन

देवगाव (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यतील व निफाड तालुक्यातील देवगाव येथील पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलात (एसएसबी) रुजू झालेल्या महिला जवान गायत्री जाधव हिचे नुकतेच निधन झाले. शनिवारी (ता. ७) माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गायत्रीच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी कुटुंबीयांना दोन लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. (Chhagan Bhujbal consoles family of female martyr jawan Gayatri Jadhav Nashik News)

अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण घेत ती २०२१ मध्ये स्टाफ सिलेक्शनच्या सीमा सुरक्षा बलाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. त्यानंतर राजस्थान येथील अलवर येथे प्रशिक्षणासाठी तिची निवडही झाली. राजस्थानमध्ये प्रशिक्षण पूर्ण करत असतानाच खड्ड्यात पडून तिचा अपघात झाला.

या वेळी तिच्या मेंदूवर जयपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने एम्स रुग्णालयात (दिल्ली) दाखल करण्यात येणार होते. मात्र तिथे जाण्यापूर्वीच तिची तब्येत खालावली व त्यातच तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik Sports Update : दिव्यांग खेळाडू दिलीप गावितचे यश!

याबाबत माहिती कळताच माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी गायत्रीच्या घरी जाऊन सांत्वन केले. गायत्रीचे मामा गणेश कोकणे व आई-वडिलांनी मृत गायत्रीच्या आजारपणादरम्यान आलेल्या अडचणींची माहिती दिली. मृत गायत्रीच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत दोन लाखांची मदत भुजबळांनी जाहीर केली.

माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे, माजी सरपंच विनोद जोशी, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, पांडुरंग राऊत, सतीश लोहारकर, राजेंद्र मेमाणे, मनोहर बोचरे, धनंजय जोशी, नीलेश उफाडे, गोरख निलख, संपत अढांगळे, जावेद शेख आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Nashik Agriculture News: पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; रब्बीतील पिकेही धोक्यात!

टॅग्स :Nashikindian armyNiphad