Dada Bhuse News : Quality City मधून होणार नाशिकचा कायापालट : दादा भुसे

Dada Bhuse News
Dada Bhuse Newsesakal

Nashik News : केंद्र सरकारच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे ‘क्वालिटी सिटी’ म्हणून पहिल्या टप्प्यात देशातील ५ शहरांमध्ये नाशिकची निवड करण्यात आली.

कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण या बाबीवर नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सहकार्याने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

तसेच जनतेच्या सहकार्यातून देशात शहराला ‘नंबर वन’ बनवण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली. (Dada Bhuse Statement Nashik will be transformed from Quality City make Number One in country cooperation of public Nashik News)

क्वालिटी सिटी नाशिकच्या सुकाणू समितीने श्री. भुसे यांची भेट घेतली. यावेळी नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक जितुभाई ठक्कर, जिल्हाधिकारी डी. गंगाधरन, उद्योजक हेमंत राठी, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, शिक्षण अभ्यासक सचिन जोशी, निखिल पांचाळ, धनंजय बेळे, अनंत राजेगावकर, स्वरूपा व माजी उपमहापौर अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, बंटी तिदमे, युवराज मोरे आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी नाशिक महापालिका, नाशिक जिल्हा परिषद, क्रेडाई नाशिक मेट्रो, नाशिक सिटीझन्स फोरम व श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dada Bhuse News
Dada Bhuse : शहरात हाट बाजार संकल्पना राबविणार : पालकमंत्री भुसे

श्री.भुसे म्हणाले, की स्वच्छता, शिक्षण आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांचा कौशल्य विकास कार्यक्रम आणि त्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी विविध कार्यक्रम होत आहेत.

त्यासोबत स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून शाळा, वॉर्ड, सर्व प्रशासकीय व खासगी कार्यालयांमध्ये स्वच्छता यावी आणि आपले शहर स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा सर्व नागरिकांना मिळावी यासाठी विविध जनजागृती मोहिमा राबविल्या जातील.

शिक्षणांतर्गत क्वालिटी सिटीची पहिली पायरी म्हणजे शाळेतून होणारी गळती रोखणे आणि बांधकाम कामगारांच्या मुलांची या महिन्याच्या अखेरीस शाळेत नोंदणी करणे असा असून घरगुती कामगारांच्या प्रशिक्षणालाही क्वालिटी सिटी मध्ये महत्त्व दिले जात आहे.

Dada Bhuse News
Dada Bhuse: ‘ट्रेलर’ त्यांनी दाखवला ‘पिक्चर’ मी दाखवतो! पालकमंत्री भुसेंचे विरोधकांना थेट आव्हान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com