Dada Bhuse : कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण सरकारच्या माध्यमातून दिले जाईल : दादा भुसे

कुणबी नोंद असेल तो कायद्याच्या चौकटीत ओबीसीत बसेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
Dada Bhuse
Dada Bhuseesakal

Dada Bhuse : कष्ट करणारे अनेक मराठा समाजाचे कुटुंब आहेत. त्यांची परिस्थिती खालावली आहे. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या गोरगरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे, ही मागणी होती. त्या मागणीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

कुणबी नोंद असेल तो कायद्याच्या चौकटीत ओबीसीत बसेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. (Dada bhuse statement of Permanent reservation will be given through Government nashik news)

येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सर्व निर्णयांवर शिक्कामोर्तब करत कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाईल, असेही भुसे यांनी सांगितले. पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. २७) शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी भुसे बोलत होते.

Dada Bhuse
Dada Bhuse: शेतकऱ्यांना बसणार आश्चर्याचा धक्का ! मुख्यमंत्री 'या' दिवशी करणार मदत जाहीर, दादा भुसेंनी दिली माहिती

भुसे म्हणाले, की २३ जानेवारी हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस, तर २७ जानेवारी हा धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचा जन्मदिवस आहे. हे दोन्ही दिवस शिवसैनिक उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करतात. आज नाशिकमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचे पूजन करून हा दिवस साजरा केला जात आहे.

या दिवसाचे औचित्य साधून गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे-पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता. त्याची यशस्वी सांगता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या गोरगरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे, ही मागणी होती. त्या मागणीवर शिक्कामोर्तब झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Dada Bhuse
Dada Bhuse : ...तर सर्वोच्च न्यायालयावर शंका उपस्थित करणार का? दादा भुसेंचा उद्धव ठाकरेंना टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com