Dada Bhuse | बोरी अंबेदरी बंदिस्त जलवाहिनीमुळे लाभ क्षेत्रात शाश्वत सिंचन सुविधा : दादा भुसे

Guardian Minister Dada Bhuse during the Jalpuja of the water that came to the canal in the first cycle after the work of the first phase of the Bori Ambedari Bandit Canal.
Guardian Minister Dada Bhuse during the Jalpuja of the water that came to the canal in the first cycle after the work of the first phase of the Bori Ambedari Bandit Canal.esakal

मालेगाव (जि. नाशिक) : बोरी अंबेदरी या लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या बंदिस्त कालव्याद्वारे पाणीपुरवठा योजनेमुळे माळमाथ्यावरील गावांना फायदा होणार आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होवून लाभ क्षेत्रातील गावांच्या शेतीस शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे केले. (Dada Bhuse statement Sustainable Irrigation Facility in Benefit Area due to Bori Ambedari Dam Canal nashik news)

तालुक्यातील बोरी अंबेदरी मुख्य कालव्याच्या बंदिस्त नलिकेद्वारे पाणी आवर्तनाच्या पहिल्या टप्प्याचे जलपूजन श्री. भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पवार, उपअभियंता महेंद्र नेटावटे, कनिष्ठ अभियंता सुनिल गांगुर्डे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आदींसह सरपंच, उपसरपंच, विकास संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व लाभ क्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, तालुक्यातील टिंगरीजवळ १९९२ ला बोरी नदीवर बोरी- अंबेदरी प्रकल्पाचे काम झाले. यानंतरच्या काळात लाभक्षेत्रातील ५० टक्के क्षेत्रास सिंचनाचा लाभ झाला. बंदिस्त पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून १०० टक्के क्षेत्रास लाभ होईल.

या योजनेचा अठरा किलोमीटरपैकी पावणेतीन किलोमीटरचे काम आतापर्यंत झाले. माळमाथ्याच्या विकासामध्ये हा प्रकल्प क्रांतिकारक असून त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल.

जुन्या धरणांमध्ये हा प्रकल्प महाराष्ट्रातील आदर्श प्रकल्प म्हणून नावारुपास येईल. या पाणी आवर्तनाच्या पहिल्या टप्प्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीचे पाणी उपलब्ध होणार आहे.

बंदिस्त पाणी पुरवठा योजनेने दहा तासाच्या आत पाणी उपलब्ध होईल. बंदिस्त पाईपलाईनमुळे पाण्यात बचत होऊन पुढील आवर्तन सोडण्यास मदत होईल. शेततळ्यांना देखील या पाण्याची सुविधा मिळणार आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Guardian Minister Dada Bhuse during the Jalpuja of the water that came to the canal in the first cycle after the work of the first phase of the Bori Ambedari Bandit Canal.
Aditya Thackeray | खोके सरकारकडून पोकळ अश्‍वासनं : आदित्य ठाकरे

कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचेल. माळमाथ्याचे नंदनवन होण्यास हातभार लागेल.श्री. शिंदे यांनी बोरी अंबेदरी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र जाधव, माजी उपसभापती सुनील

देवरे, अस्ताने सरपंच अविनाश शिरसाठ, दीपक देसले, निलेश कचवे, संजय दुसाने, मनोहर बच्छाव, सखाराम घोडके, लकी गील, नंदुतात्या सोयगावकर, विनोद वाघ, केवळ हिरे, निलेश आहेर, भरत देवरे, भिकन शेळके आदींसह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करताना विष प्राशन केलेला गणेश कचवे हा शेतकरी जलपूजन करताना व व्यासपीठावर अग्रभागी होता. कचवे दांपत्याच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यामुळे आंदोलनकर्त्यांचा विरोध मावळला.

Guardian Minister Dada Bhuse during the Jalpuja of the water that came to the canal in the first cycle after the work of the first phase of the Bori Ambedari Bandit Canal.
Aditya Thackeray | गद्दारांना जनतेने धडा शिकवावा : आदित्य ठाकरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com