Nashik Phalke film industry : मुंढेगाव येथे दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टी जागेसाठी दादा भुसेंचे साकडे

Dadasaheb Phalke film industry place in Mundhegaon Dada bhuse appeal nashik news
Dadasaheb Phalke film industry place in Mundhegaon Dada bhuse appeal nashik newssakal

Nashik Phalke film industry : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नाशिक जिल्ह्यात मुंढेगाव येथे चित्रपटसृष्टीसाठी जागा मिळावी म्हणून पालकमंत्री दादा भुसे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना साकडे घातले. (Dadasaheb Phalke film industry place in Mundhegaon Dada bhuse appeal nashik news)

नाशिक जिल्ह्यात चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण सुरू असते. अनेक कलावंत नाशिक शहराने दिले आहेत..

शहरात चित्रपटनगरी असावी, अशी मागणी कलावंतांसह नाशिककरांनी पालकमंत्री भुसे यांच्याकडे केली. श्री. भुसे यांनी दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टीला मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथे मंजुरी मिळण्याबाबत महसूलमंत्री विखे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला.

मुंढेगाव येथे ४७ हेक्टर ३९ आर जागेवर दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टी प्रस्तावित आहे. यासाठी पालकमंत्री भुसे यांनी पाठपुरावा केला असून, या जागेबाबत मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी (नाशिक) यांनी महसूल विभागास त्रुटी-पूर्ततेसह सादर केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dadasaheb Phalke film industry place in Mundhegaon Dada bhuse appeal nashik news
Onion Subsidy : NCCFसाठी कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्‍न गंभीर; संस्थेचे नाव नसल्याने गोंधळ

लवकरात लवकर मंजुरी मिळण्याबाबत ते प्रयत्नशील आहेत. पुरवणी अधिवेशनात या जागा मंजुरी मिळविण्यासाठी पालकमंत्री भुसे आग्रही आहेत.

नाशिक जिल्ह्यात चित्रपटनगरी तयार झाल्यास स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. तसेच, स्थानिक कलावंतांनाही वाव मिळणार असल्याने नाशिकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

Dadasaheb Phalke film industry place in Mundhegaon Dada bhuse appeal nashik news
Nashik News : प्रवीण पाटील यांच्या बदलीस ‘मॅट’कडून स्थगिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com