नाशिक- सीएनजीचा विस्कळित झालेला पुरवठा येत्या महिन्याभरात सुरळीत केला जाईल. प्रत्येक पंपाला रोज किमान तीन हजार किलो सीएनजीचा पुरवठा केला जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) च्या पदाधिकाऱ्यांनी दिली. सोमवारी (ता. २१) झालेल्या बैठकीतील सकारात्मक चर्चेनंतर नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने २६ एप्रिलपासून सीएनजी विक्री बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.