फोटो -NSK26H33273
नाशिक : येथील दंडे गोल्ड अँड डायमंड्समध्ये दागिन्यांच्या खरेदीसाठी झालेली गर्दी.
दंडे गोल्ड अँड डायमंड्सतर्फे
दिवाळीनिमित्त विशेष सवलत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : दंडे गोल्ड अँड डायमंड्सतर्फे ११ ऑक्टोबरपासून १५ नोव्हेंबर या कालावधीत विशेष सणासुदीची ऑफर सुरू करण्यात आली आहे. या ऑफरअंतर्गत सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५० टक्क्यांपर्यंत सूट आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट अशा आकर्षक सवलती ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
दसरा आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर दंडे गोल्ड अँड डायमंड्सच्या नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर येथील शाखांमध्ये ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. नवीन दागिने खरेदी करणे, कुटुंबीयांना भेटवस्तू देणे तसेच शुभमुहूर्तावर सोन्याची खरेदी करणे यासाठी ग्राहकांकडून सराफी पेढ्यांना पसंती दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर दंडे गोल्ड अँड डायमंड्समध्ये विविध प्रकारच्या सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची वर्दळ वाढत आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन पारंपरिक दागिन्यांपासून ते आधुनिक डिझाइन्सपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार दागिन्यांची निवड करता येत आहे. सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना आकर्षक सवलतींचा लाभ घेण्याची संधी मिळत असल्याने ग्राहकांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.