esakal | नाशिक : संततधारेने काझी गढीची माती ढासळतेय; रहिवाशांचा जीव टांगणीला
sakal

बोलून बातमी शोधा

Kazi Gadhi

नाशिक : संततधारेने काझी गढीची माती ढासळतेय

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने काझी गढीची माती ढासळत आहे. मुसळधार पाऊस झाला नसल्याने अद्याप सुदैवाने कुठलीही दुर्घटना झालेली नाही. असे असलेतरी गढीवासीयांचा जीव मात्र टांगणीला आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाण्याने काझी गढीची माती थोड्याफार प्रमाणात ढासळत आहे.


यावर्षीही संततधार पावसाने गढीची माती पाण्याने धुतली जाऊन थोड्याफार प्रमाणात ढासळल्याचे दिसत आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी संरक्षण भिंत जरी बांधले नसली तरी निसर्गाने मात्र वृक्षांच्या स्वरूपात गढीस आधार देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे माती ढासळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भीतीने गढीवासीयांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेकवेळा गढी ढासळण्याचे प्रकार घडले आहे. तरीदेखील प्रशासनास गांभीर्य नसल्याने रहिवाशांची मागणी होऊनदेखील अद्याप संरक्षण भिंत बांधलेली नाही. प्रशासनाकडून गढीच्या मालकी संदर्भात प्रश्न उपस्थित केला जातो.

प्रशासनाने यासंदर्भात चौकशी करून आवश्यक ती कारवाई करणे आवश्यक आहे. असे झाल्यास संरक्षण भिंत बांधण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. केवळ रहिवाशांना नोटीस बजावून स्थलांतरित होण्याचे सांगण्याचा सोपस्कार करणे, तसेच अतिरिक्त पाऊस पाहणी दौरा करत आश्वासन देणे योग्य नाही. अशी प्रतिक्रिया रहिवाशांकडून देण्यात येत आहे. अचानक मुसळधार पाऊस झाला आणि गडी ढासळून दुर्घटना झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार, माळीणसारखी दुर्घटना घडल्यास प्रशासनास जाग येईल का, असे प्रश्नदेखील रहिवाशांकडून उपस्थित केले जात आहे. पाऊस झाला की रहिवाशांच्या डोळ्याला डोळा लागत नाही. काही होणार तर नाही ना, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण होत आहे.

हेही वाचा: नाशिक शहरात पोलिस परवानगीनंतरच लावता येणार होर्डिंग

loading image
go to top