Nashik News: धोकादायक रामसेतूची होणार केवळ डागडुजी; स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालात मिळाले जीवदान

Ramsetu
Ramsetuesakal

नाशिक : कधीकाळी शहरातून पंचवटीत जाण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या रामसेतूला स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जीवदान मिळाले आहे. त्यामुळे आता या पुलाची केवळ डागडुजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Dangerous Ram Setu will repaired only Structural audit report Nashik News)

(कै.) भय्यासाहेब पांडे नाशिकचे नगराध्यक्ष असताना शहरातून पंचवटीत जाण्यासाठी व पंचवटीतून शहरात जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून हा पूल उभारण्यात आला होता. कालौघात या पुलाने असंख्य पुरांसह तब्बल चार महापूरही अनुभवले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी या पुलाला समांतर पुलाची निर्मिती करण्यात येऊन जुन्या पुलाची डागडुजीही करण्यात आली.

परंतु, आता या पुलाचा स्लॅब अनेक ठिकाणी निघून गेल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर स्लॅब निखळल्याने अनेक ठिकाणी हा पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे स्मार्टसिटीकडून या पुलाच्या जागी नवीन पूल प्रस्तावित करण्यात आला होता.

त्यासाठी राज्य शासनाने निश्‍चित केलेल्या संस्थेकडे या पुलाबाबत स्ट्रक्चरल अहवालासाठी पाठपुरावा सुरू होता. या संस्थेकडून स्मार्टसिटीला नुकताच हा अहवाल प्राप्त झाला असून, आता नवीन पुलाऐवजी केवळ डागडुजी केली जाणार आहे.

Ramsetu
Success Story : वडिलांची स्वप्नपूर्ती करत निफाडचा चैतन्य बनला Indigoमघ्ये पायलट!

पुलाचा ताबा व्यावसायिकांकडे

हा पूल पूर्वी अतिशय अरुंद होता, सिंहस्थ कुंभमेळ्याच्यावेळी या पुलाच्या डागडुजीसह समांतर पुलाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून या पुलाचा ताबा रस्त्यावरील व्यावसायिकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे या पुलावरून वाहनांना बंदी असतानाही अनेक जण दुचाकीही चालवत आहेत. त्यामुळे हा पूल अधिक धोकादायक बनला आहे.

व्यावसायिकांनी पुलाच्या दोन्ही बाजूंना बांबू बांधून जागाही आरक्षित करून त्याठिकाणी प्लॅस्टिक लावल्याने पुलाला ओंगळवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोहीम राबवूनही हे विक्रेते याठिकाणाहून हलायला तयार नाहीत. त्यातच जुन्या व नवीन पुलाच्या मधोमध मोठे खड्डेही पडले आहेत.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Ramsetu
Nashik Bribe Crime: जन्म नोंदीसाठी मागितली पाचशे रुपयांची लाच! NMCच्या वरिष्ठ महिला लिपिकेला अटक

कल्पना पांडे यांचे आंदोलन

धोकादायक बनलेल्या पुलाच्या जागी स्मार्टसिटीकडून नवीन पूल बांधण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी नवीन पुलाचे डिझाइनही निश्‍चित करण्यात आले होते. याविरोधात काँग्रेसच्या पदाधिकारी कल्पना पांडे यांनी परिसरातील व्यावसायिकांसह नवीन पुलाविरोधात आंदोलन छेडले होते. आता नवीन पूल रद्द झाल्याने पांडे यांच्या आंदोलनाला यश आल्याचे दिसते.

"रामसेतूचा स्ट्रक्चरल अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे नवीन पुलाऐवजी या पुलाची डागडुजी करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे." -सुमंत मोरे, सीईओ, स्मार्टसिटी कंपनी

Ramsetu
Nashik News : खडकाळी चौकात पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com