Success Story : वडिलांची स्वप्नपूर्ती करत निफाडचा चैतन्य बनला Indigoमघ्ये पायलट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chaitanya preparing for flight

Success Story : वडिलांची स्वप्नपूर्ती करत निफाडचा चैतन्य बनला Indigoमघ्ये पायलट!

निफाड (जि. नाशिक) : द्राक्षनगरी म्हणून ओळख असलेल्या निफाड नगरीचा चैतन्य वडिलांच्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी पायलट बनला आहे. तो आज गुरुवार (ता.२९) पासून इंडिगो एअरलाइन्समध्ये रुजू झाला आहे. त्याची ही भरारी पाहायला आझ वजिल हयात नाहीत, पण त्यांनी पाहिलेले स्वप्न चैतन्यने पूर्ण केले आहे, याचा संपूर्ण परिसरासह कुटूंबियांना मोठा आनंद झालेला आहे. (Success Story Fulfilling fathers dream Niphad chaitanya ghatmale become pilot in Indigo nashik news)

निफाड शहरातील हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेत असलेले जितेंद्र घटमाळे दाम्पत्याच्या वेली वरती चैतन्य नावाचं फुल उमललं. चैतन्याच्या पहिल्या वाढदिवसालाच आपल्या मुलाला पायलट बनवण्याचा चंग त्यांनी बांधला होता. कुटुंब सांभाळत घटमाळे यांनी चैतन्याला शिक्षण दिले.

त्याचे शालेय शिक्षण निफाड येथील वैनतेय विद्यालयात झाले. बारावीनंतर इंजिनिअरिंग प्रवरानगर येथे तर एव्हिएशन पायलट ट्रेनिंग शिरपूर येथे पूर्ण केले. साउथ आफ्रिका ऑनलाईनमध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर सिंगापूरच्या इंडिगो एअरलाइनमध्ये चैतन्याची पायलट म्हणून निवड झाली आहे. दरम्यानच्या काळामध्ये २०१५ मध्ये घटमाळे परिवाराचा आधारस्तंभ हिरावला गेला.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Rural Police Recruitment : नाशिक ग्रामीण पोलीसभरतीसाठी तब्बल 21 हजार अर्ज दाखल!

वडील जितेंद्र घटमाळे यांचे निधन झाले. आईचे आजारपण अशाही परिस्थितीमध्ये वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी खडतर परिस्थितीतून मार्ग काढत मनाशी पायलट बनण्याचे ध्येय निश्चित असल्याने त्या दृष्टीने चैतन्यने मार्गक्रमण केले. आजारी असताना सुद्धा आईने तसेच भावाने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी चैतन्याला उभारी दिली.

खऱ्या अर्थाने नभांगणात उडण्यासाठी बळ दिल्यानेच निफाडचा प्रथम पायलट म्हणून चैतन्याची ओळख निर्माण झाली. आपला भाऊ पायलट व्हावा यासाठी निफाडच्या हॉटेल वैभवमध्ये वडिलांनी संपूर्ण हॉटेलवर विमानाचे छायाचित्र लावले होते असे चैतन्याचे भाऊ प्रेम घटमाळे यांनी सांगितले आहे.

"माझी पायलट म्हणून झालेली निवड खऱ्या अर्थाने वडिलांच्या स्वप्नांची पूर्ती झालेली आहे. भाऊ आणि आई यांनी दिलेल्या पाठबळामुळे हे शक्य झाले आहे. आई आजारी असताना देखील मला पायलट होण्यासाठी माझ्यात निर्माण केलेली ऊर्जा ध्येयापर्यंत घेऊन गेली आहे."

- चैतन्य घटमाळे, निफाडचा पहिला पायलट.

हेही वाचा: SAKAL Impact News : उद्यान दुरूस्तीच्या हालचालींना वेग; समस्या सोडविण्यास सुरवात