Trees
sakal
नाशिक: मागील सिंहस्थामध्ये रस्ता रुंदीकरणाच्या माध्यमातून रस्ते विकास झाला, परंतु रस्त्याच्या मधोमध असलेले मोठे वृक्ष अद्यापही तसेच असल्याने अपघाताला कारणीभूत ठरत आहे. यातून अनेकांचे जीवदेखील गेले आहे. त्यामुळे रस्त्यातील वृक्ष हटविण्यासाठी कालबद्ध मोहीम हाती घेण्याची मागणी विविध संघटनांनी नाशिक सिटीझन फोरम (एनसीएफ) च्या माध्यमातून महापालिकेकडे केली.