Nashik : सप्तशृंगी गड घाटात रात्री पडलेली दरड तातडीने हटवली, वाहतूक सुरळीत...

Darad in Saptashrungi Gad Ghat
Darad in Saptashrungi Gad Ghatesakal

वणी (जि. नाशिक) : आद्यशक्तीपीठ सप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्यावर गुरुवारी ता. २० रात्री साडे बारा ते एक वाजेच्या सुमारास जोरदार झालेल्या पावसामूळे मातीचा मलबासह दरड कोसळली होती. रात्रीची घाट रस्त्यावर वाहानांची वर्दळ नसल्यामूळे कुठल्याही प्रकारची हाणी झाली नाही.

रात्री सप्तशृंगी गडावरील स्थानिक वाहन गडावर जात असतांना रस्त्यात दरड पडल्याची घटना बघितल्याने याबाबत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीस याबाबतची माहिती कळवली. दरम्यान सप्तशृंगी गड घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक घटनास्थळी जेसीबीसह रात्री दीड वाजेच्या सुमारास दाखल होत. (darad in Saptashrungi Gad Ghat removed immediately traffic resolved Nashik Latest Marathi News)

रस्त्यावर पडलेली दगडे व मातीचा मलबा जेसीबीच्या सहाय्यान भर पावसात हलविण्यात येवून नांदूरी ते सप्तशृंगी गड या दहा किलोमीटर घाट रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. यावेळी चालता बोलता मदत केंद्राचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक अधिकारी जॉन भालेकर, पराग कुलकर्णी, रुपेश गवळी, रवींद्र पवार, नितीन गुजर आदींसह पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य करीत रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.

दरम्यान पावसाळयात नांदुरी - सप्तशृंगी गड घाट रस्त्यावर छोटे माेठे दरड पडण्याच्या घटना सातत्याने होत असतात. गडावरील मंदीराच्या शिखर व परीसरातील धोकेदायक भागात दरड कोसळण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी प्रतिंबधक उपाय म्हणून फ्लेक्झीबल बॅरीअर जाळ्या लावून रॉकफॉल बॅरीअर लावण्यात आले आहे. त्यामूळे संभाव्य धोका कमी झाला आहे. त्याच धर्तीवर घाट रस्त्यावरील यु टर्न ते गडावरील वनौषधी उद्याना पर्यंतचा घाट रस्तावर

Darad in Saptashrungi Gad Ghat
NMC News : एकाही विभागाकडे हालचाल नोंद रजिस्टर नसल्याची बाब उघड!

सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग यांनी संभाव्य दुर्घटना घडू नये यासाठी या मार्गावरील धोकेदायक भागाचे सर्वेक्षण करुन धोकदायक ठिकाणी फ्लेक्झीबल बॅरीअर जाळ्या लावण्याची आवश्यकता आहे.

"सप्तशृंगी गड घाटात पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने होत असतात. अशा वेळी चालता बोलता मदत केंद्रातंर्गत सहकार्यांसह तातडीने मदत करुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असतो. दरड कोसळून मोठी दुर्घटना होवू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कायम स्वरुपी उपाययोजना करणे गरजे आहे."

- संदीप बेनके, ग्रामपंचायत सदस्य, सप्तशृंगी गड.

Darad in Saptashrungi Gad Ghat
Police Joint Patrol Campaign : दिवाळी सुटीत उद्योगांमधील चोऱ्या रोखण्याचे आव्हान!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com