Nashik Crime: सोनसाखळी खेचणाऱ्यास धाडसी युवकाने पकडले; पोलीस आयुक्तांकडून सन्मान

Nashik: Police Commissioner Sandeep Karnik honored the two youths who caught the chain thieves from Gangapur Road area. Gangapur Police Station team on that occasion. In another photo, the team of Gangapur police station with two gold chain thieves.
Nashik: Police Commissioner Sandeep Karnik honored the two youths who caught the chain thieves from Gangapur Road area. Gangapur Police Station team on that occasion. In another photo, the team of Gangapur police station with two gold chain thieves.esakal

नाशिक : गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून पलायन करणाऱ्या चोरट्यास धाडसी दुचाकीस्वाराने पाठलाग करीत पकडले.

किरण शिवाजी ताडगे असे धाडसी दुचाकीस्वाराचे नाव असून, दुसऱ्या संशयिताला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते धाडसी युवकांचा सन्मान करण्यात आला. (Dared youth catches gold chain puller Honored by Commissioner of Police Nashik Crime)

मयुर वसंत गायकवाड (३३, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर), पप्पु चंद्रबली चव्हाण (४१, रा. श्रमिकनगर, सातपूर) अशी सोनसाखळी चोरट्यांची नावे आहेत. गेल्या गुरुवारी (ता.७) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास माधुरी गणेश जाधव (रा. महिरावणी, त्र्यंबकरोड) या आकाशवाणी टॉवर परिसराजवळील भाजी मार्केट परिसरातून पायी जात होत्या.

त्यावेळी बुलेटवरून आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी माधुरी यांच्या गळ्यातील ६० हजारांची सोन्याची पोत ओरबाडून नेली. माधुरी यांनी आरडाओरड केला असता, किरण ताडगे (रा. मखमलाबाद) यांनी प्रसंगावधान राखत दुचाकीने संशयित चोरट्यांचा पाठलाग करीत त्यांच्या दुचाकीस अडवून दोघांना खाली पाडले.

त्यावेळी गर्दी झाल्याने एक संशयिताने पोबारा केला तर, ताडगे यांनी एकाला पकडले. ताडगे यांचा मित्र निलेश बिरारी यांनी ११२ क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, त्याचवेळी दुचाकी चोरीचा तपास करत असलेले पोलिस अंमलदार सोनु खाडे हे गर्दी दिसल्याने चौकशीसाठी थांबले. त्यावेळी त्यांनी चोरट्यास ताब्यात घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही तपास करीत दुसऱ्या संशयितालाही पकडले.

दोघांकडे केलेल्या चौकशीतून त्यांनी गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार व सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक असे एकूण पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

Nashik: Police Commissioner Sandeep Karnik honored the two youths who caught the chain thieves from Gangapur Road area. Gangapur Police Station team on that occasion. In another photo, the team of Gangapur police station with two gold chain thieves.
Nashik Bribe Crime: फुले महामंडळाच्या महिला लिपिकाला अटक; 2 हजारांची लाच घेताना केली कारवाई

पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे १२१ ग्रॅम वजनाचे सोने व गुन्ह्यांमध्ये वापरलेली दुचाकी असा एकूण ७ लाख २१ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आयुष्यक्तांकडून सन्मान

चोरट्यांनी जबरी चोरीतील दागिने शिवाजीनगर येथील एस. के. ज्वेलर्स दुकान मालक मनोहर बाबुराव कुमावत यास विक्री केल्याचे पोलिस तपासात समोर आले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी किरण ताडगे व निलेश बिरारी यांचे अभिनंदन केले.

गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एन. व्ही. पवार, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, अंमलदार रवींद्र मोहिते, गिरीष महाले, गणेश रेहरे, मिलींदसिंग परदेशी, तुषार मंडले आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

Nashik: Police Commissioner Sandeep Karnik honored the two youths who caught the chain thieves from Gangapur Road area. Gangapur Police Station team on that occasion. In another photo, the team of Gangapur police station with two gold chain thieves.
Nashik Crime News : कारमधून 12 किलो गांजाची तस्करी; शहर गुन्हे शाखेची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com