Bomb
sakal
नाशिक: चेहेडी येथील दारणा नदीपात्रात शनिवारी (ता. ४) निकामी झालेला बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली. हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, पोलिस फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने अधिक चौकशी करीत आहेत. दारणा नदीच्या पुराच्या पाण्यात हा बॉम्ब वाहून आला असण्याची शक्यता आहे.