Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandiresakal

Nashik : आयोध्येत भाविकांना फेब्रुवारी 2024 पासून दर्शन

Published on

नाशिक : अयोध्येतील राममंदिराच्‍या (Ayodhya Ram Mandir) उभारणीकडे देशवासीयांचे लक्ष लागले असताना, यासंदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आली. फेब्रुवारी २०२४ पर्यंत नूतन गर्भागृह व पहिल्‍या मजल्‍याचे बांधकाम पूर्ण होणार आहे. याच वेळी भगवान रामलल्‍लांची नूतन गर्भगृहात प्रतिष्ठापना केली जाणार असून, मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होईल व मंदिर उभारणीचे काम पुढेही सुरूच राहील, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास योजनेचे कोशाध्यक्ष श्री गोविंददेवगिरी महाराजांनी मंगळवारी (ता. १७) येथे दिली. (Darshan to devotees in Ayodhya from February 2024 Nashik News)

नाशिक दौऱ्यावर असताना, भद्रकालीदेवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्‍या गोविंददेवगिरी महाराजांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्‍हणाले, की अयोध्येचा राम सगळ्यांचा असल्‍याने कोणालाही दर्शनाला प्रतिबंध नसेल. केवळ राजकीय हेतूपेक्षा श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे. ज्ञानवापी मशीद विवादावर ते म्‍हणाले, की ज्ञानवापीमध्ये सुरू असलेला तपास नवीन नाही. असे अनेक एैतिहासिक पुरावे उपलब्‍ध असून, नंदीचे तोंड मशिदीकडे आहे. त्‍यामुळे त्‍याठिकाणी शिवलिंग मिळणे स्‍वाभाविक आहे. तीन मंदिर द्या, देशातील इतर कोणत्याही मंदिराचा वाद उद्‌भवणार नाही, असे सांगताना मुस्लिम समाजातील परिपक्व समाजाला वाद मिटावा, असे वाटत असल्‍याचा दावा त्‍यांनी केला.

Ayodhya Ram Mandir
Nashik : अंड्याच्या आकाराचा किडनी स्टोन काढण्यात डॉक्टरांना यश

ताजमहाल विवादावर ते म्‍हणाले, की मी विद्यार्थी अवस्थेपासून तेजोमहालय हे पुस्तक वाचले आहे. आम्हाला विश्वास आहे, की त्याही ठिकाणी राजपुतांनी बांधलेले शिवमंदिर होते. त्याचे तेजोमहालय नाव असावे. केवळ शहाजहानने बांधलेला मकबरा नव्हता, तर हिंदूंनी बांधलेली वास्तू होती. बंद खोल्‍या उघडून त्याचे चित्रीकरण करून घेतल्‍यास सत्‍य समोर येईल, असाही दावा त्‍यांनी केला.

Ayodhya Ram Mandir
निर्दयपणे कोंबून नेत असलेल्या 27 म्हशींची सुटका

समान नागरी कायदा नसणे हे रानटीपणाचे लक्षण

समान नागरी कायदा नसणे हे रानटीपणाचे लक्षण असल्‍याची टीका करताना जगातील कोणत्याही देशात या दृष्टीने भेदभाव नाही. सर्वांसाठी एक कायदा असणे हे नैसर्गिक असून, यालाच धर्मनिरपेक्ष म्‍हणता येईल, असे गोविंददेवगिरी महाराजांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com