

Four days without water! Women in Dasane village staged a pot protest and locked the Gram Panchayat office over the ongoing water supply crisis.
Sakal
तळवाडे दिगर (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील केरसाने ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दसाने गावात गेल्या चार दिवसांपासून पाण्याचा खडखडाट झाला आहे. गावाची सार्वजनिक विहीर शासकीय मोजणीत एका खाजगी शेतकऱ्याच्या जमिनीत निघाल्यामुळे हा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आल्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालयावर रिकाम्या हंड्यांसह जोरदार हंडा मोर्चा काढला. तसेच तोडगा न निघाल्याने आक्रमक महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून टाळे ठोकले.