festive season
sakal
नाशिक: अपप्रवृत्तींचे दहन करून सुसंस्कृत समाज निर्मितीचा सण असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याला सोने लुटण्याची परंपरा आहे. या परंपरेला धरून नवीन वस्तू, वास्तू खरेदीला ग्राहक पसंती देत असल्याने गुरुवारी (ता. २) रिअल इस्टेटसह सोने खरेदीतून दोनशे कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचा अंदाज बाजारपेठेतून येत आहे.