Crime Update : परप्रांतियांच्या गुंडागिरीने अंबडचे दत्तनगर बनतेय UP-Bihar!

Viral Video
Viral Videoesakal

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीलगत दातीरनगरमध्ये नव्याने वसलेल्या दत्तनगर वसाहतीमध्ये कामधंद्यासाठी यूपी- बिहारमधून आलेल्या परप्रांतीयांकडून गेल्या काही दिवसांपासून झुंडशाही करीत दहशत माजविली जात आहे. गुंडगिरी करणाऱ्या या परप्रांतीयांना राजकीय वरदहस्त मिळत आहे.

या वाढत्या झुंडशाहीला वेळीच आवर न घातल्यास या परिसराचा यूपी- बिहार होऊन त्याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम नाशिककरांना भोगावे लागण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांसमोरही ही झुंडशाही मोडीत काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. (dattanagar in ambad become criminals zone nashik Crime Update Latest Marathi News)

रविवारी (ता. ११) रात्री दातीरनगरमधील दत्तनगरमध्ये परप्रांतीयांच्या दोन गटामध्ये राडा झाला होता. त्याचा परिणाम गुंड प्रवृत्तीच्या या गटांनी दत्तनगरमध्ये खुलेआम हातांमध्ये लाकडी दांडके, हत्यारे घेऊन फिरताना रहिवाशांच्या घरांवर दगडफेक केली. सदर प्रकाराचा व्हिडिओ दोन दिवसांनी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अंबड पोलिस खडबडून जागे झाले आणि याप्रकरणी दोन्ही गटाच्या सुमारे बारा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अंबड पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंतेश अनिल सिंग, मिंटू राजपूत, भगवान यादव, भोला यादव, टिंकू यादव, सुमीत सिंग, रवी राजपूत, राजेश राजपूत, श्रीकांत सिंग, शालुसिंग, प्रेम राजपूत, विशाल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या दातीरनगर परिसरात दत्तनगरमध्ये मोठ्या प्रमाणात यूपी- बिहार या राज्यातून आलेला कामगार वर्ग राहतो.

या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत. याबाबत काही नागरिकांनी अंबड पोलिसात तक्रार देत कारवाईचीही मागणी केली होती. त्यासंदर्भात पोलिसांकडून अद्यापपर्यंत कारवाई होत नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला अधिक बळ मिळून त्यांच्याकडून खुलेआम दहशत माजविण्याचे प्रकार सातत्याने केले जात असल्याचे सांगितले जाते.

Viral Video
Nashik : जिल्ह्यात लम्पी आजारावर प्रतिबंधक लस उपलब्ध

राजकीय पाठबळ

काही दिवसांपूर्वी अंबड पोलिसांनी दत्तनगरमध्ये दहशत माजविणाऱ्या काही संशयितांना ताब्यात घेतले होते. या संशयितांविरुद्ध स्थानिकांकडून तक्रारी असताना त्यांना सोडविण्यासाठी एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी पोलिस ठाण्यात पोचला.

पोलिसांनी समज देऊन संशयितांना सोडले, परंतु संबंधित पदाधिकाऱ्याने दुसऱ्या दिवशी महिलांचे एक शिष्टमंडळ थेट पोलिस आयुक्तालयात पाठवून अंबड परिसरातील अवैध धंदे, महिलांची छेडखानी, वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध अंबड पोलिसांविरुद्ध तक्रारी केल्या. या प्रकारातून एका राजकीय पक्षाचा वरदहस्त असलेल्या या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

त्या राजकीय पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडूनही पाठबळ मिळत असल्याने हा ‘बारक्या’ पदाधिकारी परप्रांतीयांना हाताशी धरून दत्तनगर परिसरात गुंडांची दहशत माजवीत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पोलिसांचा वचक संपला?

गुन्हेगारीला आळा घालताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे पाठबळ पोलिस ठाण्याला असावे लागते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गुन्हेगारीत वाढ झाल्याचे पोलिसांचा वचक संपला की काय, अशी शंका जागरूक नागरिकांकडून घेतली जात आहे. तर दुसरीकडे आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली जात नसल्याने गुन्हेगार मुजोर होत असल्याचेच दत्तनगरमधील घटनेमुळे समोर आले आहे.

Viral Video
नाशिक टपाल कार्यालयात 200 कोटीचे क्लेरिंग हाउस : संदेश बैरागी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com