Nashik : जिल्ह्यात लम्पी आजारावर प्रतिबंधक लस उपलब्ध

Lumpy skin animal disease
Lumpy skin animal diseaseesakal
Updated on

नाशिक : राज्यातील जळगाव, अहमदनगर, अकोल्यासह जिल्ह्यातील काही भागात सद्यःस्थितीत गायवर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्याला रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हा परिषद सेस निधीतून सध्या एक लाख पाच हजार ३०० गोट पॉक्स लस मात्रा तातडीने उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. (Lumpy disease vaccine available in district Nashik Latest Marathi News)

जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांगरी व दुसंगवाडी या गावांमधील जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, नमुने लम्पी रोगाकरिता पॉझिटिव्ह आलेले होते, त्यानुसार पशुसंवर्धन खात्याच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे त्या गावांच्या पाच किलोमीटर परिसरातील पांगरी खुर्द, मिठसागरे, फुलेनगर, मलढोण, वावी, पिंपरवाडी, घोटेवाडी, कहांडळवाडी व सायाळे येथील एकूण सात हजार ८०० गोवर्गीय जनावरांना लम्पी रोगप्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे.

हा आजार गोचीड, गोमाश्या, डास, मच्छर यांच्या चाव्याने पसरत असल्याने या आजारास प्रतिबंध करणे तत्काळ शक्य होण्याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगामधून प्रत्येक गावात फवारणीचे औषध उपलब्ध करून देण्याबाबत यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आदेशित केलेले आहे. लम्पी त्वचारोग प्रतिबंधक लसीकरणासाठी पशुपालकांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.

Lumpy skin animal disease
श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती : आदिमाया ते नाथ अन् संत वाङ्‍मय

"बाधित गावापासून पाच किलोमीटरच्या परिसरात येणाऱ्या गावातील तीन महिने वयोगटावरील सर्व गोवर्गीय जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लसीकरण केले जाणार आहे. रोगनियंत्रणासाठी पशुपालकांनी सहकार्य करावे."

-डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद

"प्राण्यांमधील संक्रमक आणि सांसर्गिक रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये लम्पी त्वचारोगाच्या प्रादुर्भावाची माहिती पशुपालक, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस, प्रशासनास देणे बंधनकारक आहे."

-लीना बनसोड, सीईओ, जिल्हा परिषद

Lumpy skin animal disease
अंबडच्या दत्तनगरमध्ये गुंडांचा धिंगाणा; रहिवाशांच्या घरांवर दगडफेक, Video Viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

aaple sarkar seva kendra
Judiciary Transition: Judge Uday Hingmire Transferred from Satana to Bhandara District
Ambad village drinking water shortage
Minor student blackmail case in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com