सुनेकडून निराधार सासू-सासऱ्यांची फसवणूक; न्यायाची अपेक्षा

cheating with in laws
cheating with in lawsesakal
Updated on

नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय गॅसगळती दुर्घटनेत (nashik-oxygen-leak) मृत पावलेल्या मुलाच्या नावाने मिळालेली लाखोंची शासकीय मदत सुनेने निराधार सासू-सासऱ्यांची फसवणूक करून स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप सासू-सासऱ्यांनी केला.(daughter-in-law-Cheating-with-in-laws-nashik-marathi-news)

सुनेकडून निराधार सासू-सासऱ्यांची फसवणूक

प्रवीण पिरसिंग महाले यांचा डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय गॅसगळती दुर्घटनेत मृत्यू झाला होता. घटनेत मृत पावलेल्या २२ जणांच्या कुटुंबीयांना राज्य शासन आणि महापालिकेकडून प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक शासकीय मदत जाहीर केली होती. काही दिवसांत ती मदत कुटुंबीयांना मिळालीदेखील. दरम्यान, प्रवीण यांची पत्नी बऱ्याच वर्षांपासून त्यांना सोडून माहेरी निघून गेली होती. शासकीय मदत मिळणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी प्रवीणच्या आई-वडिलांकडे येऊन मदतीची रक्कम स्वतःच्या नावावर मिळण्यास हरकत नसल्याचे संमतीपत्र तयार केले. सासू सासरे लता महाले, पिरसिंग महाले यांच्या अज्ञानाची संधी साधली. फसवणूक करत त्यांची सही आणि अंगठा संमतीपत्रावर घेतला. मदतीची रक्कम मिळताच सासू-सासऱ्यांना पुन्हा निराधार सोडून माहेरी निघून गेली.

cheating with in laws
निर्बंध कायम राहून दुकानांप्रमाणे मॉलला परवानगी?

आत्मदहनाचा इशारा

याबाबत महाले वृद्ध दांपत्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन न्याय मिळण्याची मागणी केली. त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. न्याय मिळाला नाही, तर येत्या काही दिवसांत महाले दांपत्य आणि त्यांची मुलगी मनीषा सरोदे तिघांकडून जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, पोलिस आयुक्तालय कार्यालयासमोर तिघे एक-एक करून आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.याबाबत न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी शुक्रवारी (ता. १८) शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com