
बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरु-शिष्य समजल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे जोडीला धक्का देत कारखान्यावर एक हाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने कूच केली आहे. यात शिष्य असलेल्या रंजनकुमार तावरे यांना धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले आहे. 'अजित पवार यांनी करुन दाखविले...' या शब्दात कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखवली.