Nashik News : बेपत्ता महिलेसह दोन्ही मुलांचे मृतदेह आढळले शेततळ्यात

या प्रकरणी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या माहितीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
Dead body
Dead body esakal

लासलगाव : निफाड तालुक्यातील शिवापूर (शेळकेवाडी) येथून सोमवार (ता. ५)पासून घरातून निघून गेलेल्या विवाहित महिला व तिच्या दोन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यात सापडले असून, या प्रकरणी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या माहितीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. (Dead bodies of missing woman and two children found in farm at shivapur Nashik News)

शिवापूर (शेळकेवाडी) येथील ज्योती जालिंदर कोटकर आणि त्यांची दोन मुले हरीश कोटकर (वय ८) आणि कृष्णा कोटकर सोमवारपासून घरातून निघून गेले होते. घरच्यांनीत्या तिघांचा सगळीकडे शोध घेतला.

मात्र, तपास लागला नाही. गुरुवारी (ता. ८) सायंकाळी पाचला या तिघांचे मृतदेह शिवापूर शेळकेवाडी येथे त्यांच्याच मालकीच्या शेततळ्यात आढळून आली.

याबाबत माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण उद्ये तातडीने शेळकेवाडी येथे दाखल झाले व त्यांनी मृतदेहांचा पंचनामा केला.

Dead body
Cyber Crime : आता कंपनीचे कॉल्स येणार सहा अंकी क्रमांकावरुन; फोनवरुन होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा!

या प्रकरणी मृत महिलेचा भाऊ ललित कैलास कापसे (रा. निफाड) यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मृत ज्योती कोटकर निफाड येथील कैलास लक्षण कापसे यांची कन्या आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर लासलगाव पोलिस ठाणे व निफाड ग्रामीण रुग्णालयात तिच्या नातेवाइक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Dead body
Nagpur Crime: शहरात हत्यासत्र सुरूच; संघर्षनगरातील झोपडपट्टीत खून, दारुच्या नशेत केला होता दोघांवर हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com