Nashik LLB Admission : एलएलबी नोंदणीसाठी या तारखेपर्यंत मुदत; फेऱ्यांच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा

LLB Admission
LLB Admissionesakal

Nashik LLB Admission : इयत्ता बारावीनंतर विधी शाखेतील पाच वर्षे कालावधीच्या एलएलबी या अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली आहे.

नोंदणी सुरु झालेली असली तरी प्रवेश फेऱ्यांच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा कायम आहे. (Deadline for LLB registration till 22 june nashik news)

राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. यानंतर आता प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू झालेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राबविल्‍या जात असलेल्‍या या प्रक्रियेत एलएलबी (५ वर्षे) या अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी नोंदणीला सुरवात झालेली आहे.

सीईटी परीक्षेत यशस्‍वी झालेल्‍या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी गुरुवार (ता.२२) पर्यंत मुदत दिली जाणार आहे. ई -स्‍क्रुटीनीच्‍या माध्यमातून कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत असणार आहे. मुळाक्षरानुसार (अल्‍फाबेटिकल) यादी २६ जूनला प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीसंदर्भात तक्रार, हरकत नोंदविण्यासाठी २८ जूनपर्यंत मुदत दिली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

LLB Admission
Career Opportunity : तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला करिअरच्या संधीचा लाभ

याअंतर्गत पात्रताधारक विद्यार्थ्यांना गुरुवार (ता.२२) पर्यंत नोंदणीकरून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे.

जुलैमध्ये प्रवेश फेऱ्या

सद्यःस्थितीत प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेले नाही. कागदपत्रे पडताळणी व अन्‍य प्रक्रिया जूनअखेरपर्यंत चालणार आहे. त्‍यामुळे जुलैच्‍या पहिल्‍या आठवड्यापासून प्रत्‍यक्ष प्रवेश निश्‍चितीसाठीच्‍या प्रवेश फेऱ्यांना सुरवात होणार आहे.

एलएलबी (३ वर्षे) प्रवेशाची नोंदणी बुधवारपासून

पदवीनंतर ३ वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु होते आहे. बुधवार (ता.२१) पासून विद्यार्थ्यांना नोंदणी करून व कागदपत्रांची पडताळणी करून घेताना पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदविता येणार आहे.

LLB Admission
Career Selection : पालकांनो मुलांनाच ठरवू द्या भविष्याची दिशा; अन्यथा होईल दुर्दशा...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com