Latest Marathi News |'MBA Executive’च्‍या प्रवेश अर्जासाठी 31 पर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MBA Executive Admission News

Admission : ‘MBA Executive’च्‍या प्रवेश अर्जासाठी 31 पर्यंत मुदत

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्रामार्फत एमबीए एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम उपलब्‍ध केला आहे. या अभ्यासक्रमाच्‍या रिक्‍त जागांवर प्रवेशाची संधी उपलब्‍ध करून दिली जाणार आहे. इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना ३१ ऑक्‍टोबरपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येईल. (Deadline for MBA Executive admission application till 31st Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik Extra Water Supply : शहराला 200 दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी

पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्रामार्फत विविध अभ्यासक्रम उपलब्‍ध केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून एमबीए एक्झिक्युटिव्ह या अभ्यासक्रमाला सुरवात करण्यात आलेली होती. या अभ्यासक्रमाची रचना वेगळ्या स्वरूपाची असून, दोन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. कार्यकारी अधिकारी, उद्योजक यांच्‍यासाठी विकसित केलेल्‍या या अभ्यासक्रमात व्यावसायिक, नोकरदारांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध आहे.

अभ्यासवर्ग सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ या वेळेत व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या परिसरात घेतले जातात. या अभ्यासक्रमास विद्यार्थी विपणन, वित्तप्रणाली किंवा मानव संसाधन व्यवस्थापन यांसारख्या स्पेशलायझेशनची निवड करू शकणार आहेत. पात्रतेच्या निकषांचा सविस्‍तर तपशील आणि एमबीए (एक्झिक्युटिव्ह) प्रवेशाविषयीची माहिती संकेतस्‍थळावर उपलब्ध करून दिलेला आहे.

इच्‍छुक विद्यार्थ्यांना ३१ ऑक्‍टोबरपर्यंत प्रवेश अर्ज सादर करता येतील. अधिक माहितीसाठी व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उपकेंद्र नाशिक, अचानक चौक, पडसाद कर्णबधिर विद्यालयाजवळ, लेखानगर, सिडको येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: Increased Rates: अबब...! बाजरीचे भाव प्रती Quintal 3000