Nashik Extra Water Supply : शहराला 200 दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी

Nashik water supply News
Nashik water supply Newsesakal

नाशिक : शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरून महापालिकेने यंदा जलसंपदा विभागाकडे २०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदवली होती. त्यानुसार नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी मागणी मान्य केल्याने यंदा नाशिककरांना पाण्याचा वाढीव कोटा मिळणार आहे. (Extra Water Supply 200 million cubic feet of extra water to city nashik news)

Nashik water supply News
Biofloc Fish Farming Project : मत्स्यपालनातून तरुणांना लाखोंचे उत्पादन

नाशिक शहराला गंगापूर धरणाचे दारणा व मुकणे धरणातून पाणीपुरवठा होतो. जलसंपदा विभागाने प्रतिमाणसी १३५ लिटर याप्रमाणे पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने २९० दिवसांसाठी पाच हजार आठशे दशलक्ष घनफूट पाण्याची नोंदविले होते. मागील वर्षी पाच हजार सहाशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते.

दारणा धरणात मागील वर्षी २०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात धरणातून पाणी उचलताना तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्याशिवाय धरणातून पाणी उचलल्यानंतर त्यात अळी आढळून येत असल्याने आरोग्यास धोकादायक असल्याचा निष्कर्ष महापालिकेकडून काढला जातो. परिणामी येथून पाणी उचलले जात नाही. त्याऐवजी गंगापूर धरणात अतिरिक्त पाणी आरक्षित करण्याची मागणी होती. त्यानुसार मागणी पूर्ण झाली आहे.

असे आहे २९० दिवसांसाठी पाणी आरक्षण ( दशलक्ष घनफुटात)

- गंगापूर धरण - ४२००

- मुकणे धरण - १५००

- दारणा धरण- १००

-----------------------

एकूण ५८००

Nashik water supply News
NDCC Bankच्या चौकशीसाठी SIT : दादा भुसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com