esakal | दुर्देवी: आईचा ऑक्सिजन बेडअभावी मृत्यू; लेकीने केले सॅनिटायझर प्राशन
sakal

बोलून बातमी शोधा

death due oxygen

दुर्देवी: आईचा ऑक्सिजन बेडअभावी मृत्यू; लेकीने केले सॅनिटायझर प्राशन

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : कोरोनाचे (corona virus) थैमान संपूर्ण जगात वाढत चालले असतानाच ऑक्सिजन, बेड याचा तुटवडा (oxygen bed shortage) आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे (death) प्रमाण वाढले आहे. अशातच दिंडोरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

दिंडोरी तालुक्यात धक्कादायक घटना

दिंडोरी तालुक्‍यातील रामशेज आशेवाडी येथे राहणाऱ्या जया लक्ष्मण भुजबळ (वय 50) यांना शनिवारी (ता.१) पहाटे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नाशिकरोड येथील बिटको कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथे ऑक्सिजन बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही बाब करोना झाल्याने घरीच असलेल्या त्यांच्या तरुण मुलीला समजल्यानंतर तिने सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्‍न केला. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारांदरम्यान तिचादेखील मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आले.

.

हेही वाचा: ग्राउंड रिपोर्ट : कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना जिल्हा चेक पोस्टवर ड्युटी ?

ग्रामपंचायतीची बघ्याची भूमिका

दिंडोरी तालुक्‍यातील रामशेज आशेवाडी येथील करोनाबाधित महिलेचा ऑक्सिजन बेडअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे या महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच तिच्या करोनाबाधित तरुण मुलीनेदेखील घरीच सॅनिटायझर प्राशन करीत आत्महत्या केल्याने ग्रामस्थांनी यंत्रणेविरोधात संताप व्यक्त केला आहे. गावामध्ये योग्य उपचारांअभावी दहा ते बारा दिवसांत सहावा बळी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने याकडे अजूनही दुर्लक्ष केल्याने अजून किती मृत्यूंची वाट प्रशासन बघत आहे, असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. गावामध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी युवावर्ग प्रयत्न करीत असून, ग्रामपंचायत प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप होत आहे.

हेही वाचा: Sakal Impact : प्रवाशांनो..पळवाटा शोधाल तर पडेल महागात!