काकांच्या निधनाचे दु;ख, त्यात पुतण्याचा सापडला मृतदेह; एकाच दिवशी कुटुंबावर मोठा आघात

अशी घटना घडणे हे अनाकलनीय असल्याची कुटुंबीयांची भावना
uncle nephew death
uncle nephew deathuncle nephew death

इंदिरानगर (नाशिक) : दुर्देव म्हणतात ते असे....काकांच्या निधनाची बातमी देण्यासाठी पुतण्याशी संपर्क केला असता त्याचीच ही धक्कादायक बातमी मिळाल्याने जाधव कुटुंबावर नियतीने मोठा आघात केला आहे. काय घडले नेमके?

कुटुंबावर नियतीचा मोठा आघात

मंगळवारी (ता.१४) विलास जाधव घरी असताना सायंकाळी सर्वांशी गप्पा मारत असताना हृदयविकाराने त्यांचा बळी घेतला, तर नाशिक येथे पुतण्या कुणाल हा दुपारी दीडच्या सुमारास गंगापूर रोड येथील हेमंत जाधव या चुलत भावाकडे सणाचे जेवण करून हॉस्पिटलकडे जाण्यासाठी निघाला. काकांच्या निधनाची बातमी देण्यासाठी त्याच्याशी संपर्क केला असता तो फोन उचलत नसल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्व जण चिंतेत पडले. सर्वत्र शोध सुरू झाला. दरम्यान, याबाबत रात्री दहाला इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांना शोधण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्यांनी तातडीने तांत्रिक विभागाचे उपनिरीक्षक देसले यांना याबाबत माहिती दिली. अवघ्या दहा मिनिटांत त्यांनी त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन साधना मिसळ परिसरात असल्याची माहिती पाठविली. रात्री अकराच्या सुमारास त्याचा चुलत भाऊ चेतन आणि दोघे मित्र मिळालेल्या नकाशानुसार त्या लोकेशनवर पोचले. तेथे त्याची दुचाकी मिळून आली. आसपास शोध घेतला असता रस्त्याच्या कडेला तो मृतावस्थेत आढळला. त्यामुळे जाधव कुटुंबीयांवर दुसरा मोठा आघात झाला.

अनाकलनीय असल्याची भावना

गंगापूर रोड पोलिसांनी यावेळी देखील सहकार्य केले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात बुधवारी (ता. १४) शवविच्छेदन झाले. हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ज्या भागात तो मिळून आला, त्या परिसरात त्याचे जाणे आणि अशी घटना घडणे हे अनाकलनीय असल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनांमुळे सटाणा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मुलावर अतिदक्षता विभागात कोरोनावर उपचार सुरू

सटाणा येथील अहिर सुवर्णकार समाजाच्या जाधव कुटुंबीयांवर मंगळवारी (ता. १३) सायंकाळी काका विलास जाधव (वय ६१), तर रात्री पुतण्या कुणाल जाधव (२४) याच्या अकस्मात मृत्यूने शोककळा पसरली. (कै.) पद्माकर, (कै.) विजय, (कै.) सदानंद, (कै.) सतीश, (कै.) चंद्रकांत, (कै.) विलास आणि सुरेश जाधव या सात भावंडांच्या कुटुंबाचे शहरात एक वेगळे स्थान आहे. काही दिवसांपूर्वीच सुरेश कोरोनामुक्त झाले आहेत, तर (कै.) सदानंद यांचा मुलगा धीरज याच्यावर सध्या नाशिक येथे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात कोरोनावर उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com