esakal | नाशिकमधील पंचवटी विभागात ४ महिन्यांपासून मृत्यूदर वाढताच
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

जोरदार लसीकरणानंतरही दोन महिन्यांपासून एकट्या पंचवटी विभागात कोरोनासह अन्य वेगवेगळ्या कारणांनी मृत्यूदरात मोठी वाढ झाल्याचे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील आकडेवारीवरून स्पष्ट होते

नाशिकमधील पंचवटी विभागात ४ महिन्यांपासून मृत्यूदर वाढताच

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : कोरोना साखळी (Coronavirus) तोडण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाय केले आहेत, मात्र जोरदार लसीकरणानंतरही (Corona vaccination) दोन महिन्यांपासून एकट्या पंचवटी विभागात कोरोनासह अन्य वेगवेगळ्या कारणांनी मृत्यूदरात (Death Rate) मोठी वाढ झाल्याचे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील आकडेवारीवरून स्पष्ट होते. (Death rate in Panchavati Nasik increased in last 4 months)

एप्रिल, मेमध्ये मृत्युदरात मोठी वाढ

कोरोना वाढत्या संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दीर्घकालीन लॉकडाउन (Lockdown), ज्येष्ठांसह तरुणांचे लसीकरण आदी उपायांची अंमलबजावणी सुरू केली, मात्र एवढे होऊनही दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले जवळचे आप्त गमवावे लागले. एवढेच नव्हे तर अनेक कुटुंबातील निम्म्यापेक्षा अधिक सदस्य कोरोनामुळे बळी (corona death) गेल्याने दुःख करावे कोणाचे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

साधारण: यावर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत दुसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्यांचे प्रमाण अधिक असलेतरी मृत्यूदर सर्वसाधारणच होता. परंतु एप्रिल, मेमध्ये त्यात मोठी वाढ झाल्याने पंचवटी स्मशानभूमीतील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे बेडही कमी पडत असल्याने अनेकांवर जमिनीवरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ तेथील कर्मचाऱ्यांवर आली आहे. पूर्वी फक्त शहरातील विद्युतदाहिनीतच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. परंतु, त्याठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जिल्हाभरातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असल्याने अंतिम विधीसाठी वेटिंग सुरू झाले होते. अंत्यसंस्कारांसाठी अनेकांना तासनतास ताटकळत राहावे लागे. त्यानंतर पंचवटी स्मशानभूमीत कोरोनाबाधितांवरही लाकडावर अंत्यसंस्कार सुरू झाल्यावर हे प्रमाण कमी झाले.

हेही वाचा: म्युकरमायकोसिस औषधांची ऑनलाइन नोंदणी गरजेची

चार महिन्यात 2300 मृत्यू

महापालिकेच्या जन्म- मृत्यू नोंद विभागात चौकशी केली असता फेब्रुवारीत दोनशे चौतीस, मार्चमध्ये तीनशे त्रेपन्न, एप्रिलमध्ये ९०३ तर २५ मेपर्यंत ८२९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अजून या महिन्याचे सहा दिवस बाकी असल्याने हा आकडा हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मृत्यूपैकी बहुतांश कोरोनाबाधित असल्याचे दिसून येते. यात फेब्रुवारी, मार्चच्या तुलनेत एप्रिल व व मे महिन्यात हा आकडा वाढल्याचे दिसून येते. गेल्या महिन्यापर्यंत पंचवटी स्मशानभूमीत असलेले नऊ बेड अंत्यसंस्कारासाठी कमी पडत असल्याने अनेकांवर जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली होती. मात्र त्यानंतर झालेल्या कडक लॉकाडाऊनमुळे संसर्गाच्या व मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे चित्र होते.

(Death rate in Panchavati Nasik increased in last 4 months)

हेही वाचा: वीस लाख लोकसंख्येसाठी अवघे बारा मानसोपचारतज्ज्ञ