कोरोना संसर्गाचा दर घटूनही मृत्यूची संख्या कायम कशी?

corona death rate
corona death rateesakal

नाशिक : शहर-जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे (corona virus) प्रमाण घटल्याने लॉकडाउनचे (lockdown) निर्बंध शिथिल झाले आहेत. त्याचवेळी शहर-जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या मात्र कायम आहे. दुसरीकडे मृतांच्या अद्ययावत माहितीसाठी महापालिकेने खासगी रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अद्याप महापालिकेकडील आकडेवारीच अपडेट नसेल, तर मग महापालिकेने राज्य शासनाला जी आकडेवारी सादर केली, त्याद्वारे दिशाभूल केली का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. (death-rate-remains-constant-corona-infection-nashik-marathi-news)

राज्य शासनाला पाठविलेल्या आकडेवारीबाबत संभ्रम

शहरात दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग टिपेला पोचला होता. नाशिकमध्ये प्रतिदिन कोरोनाबाधितांची संख्या चार ते पाच हजारांपर्यंत राहात होती. अशा काळात रोज कोरोनाबळींची संख्याही ५० ते ६० च्या आसपास असल्याचे प्रशासनातर्फे जाहीर केले जात होते. त्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या थेट १२ ते १४ पटीने घटली असून, रोज बाधितांची संख्या चार हजारांहून ३५० ते ४००पर्यंत खाली येत आहे. अशाही परिस्थितीत, मृत्यूंची संख्या मात्र मोठी दाखविली जात आहे.

संसर्ग दर अवघा ३.८ टक्के

निर्बंध शिथिल करण्यापूर्वी राज्य शासनाला ३ जूनच्या आधारे पाठविलेल्या आकडेवारीत महापालिकेने संसर्ग दर ३.८ इतकाच असल्याचे म्हटले आहे. दोन हजार ७७० ऑक्तिजन बेडपैकी ६१८ (२२.३२ टक्के) बेडवरच रुग्ण उपचार घेत असल्याचे म्हटले आहे. तर याबाबत महापालिका रुग्णालयांशी संपर्क साधला असता, संबंधित आकडेवारी जुनीच असून, खासगी रुग्णालयांकडून आकडेवारी अपडेट केली जात नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मृत्यू वाढलेले नसून, खासगी रुग्णालयांकडून आकडेवारी अपडेट केली जात असल्याने मृत्यूंची संख्या वाढल्याचे सांगितले जात आहे. असे असेल तर मग यापूर्वी शासकीय यंत्रणेकडून दिली जाणारी मृत्यूंची आकडेवारी (अपडेट न केलेली) १३ मे ८ जून अशा २५ दिवसांत एक हजार मृत्यूंची कमी दाखविली का? शासनाला तरी अपडेट नसलेली आकडेवारी पाठविली का? असे अनेक प्रश्‍न आहेत.

corona death rate
भाजपचा आरोप कोणाच्या नथीतून? - सुधाकर बडगुजर

मृत्यू कमी दाखवले?

सध्या पूर्वीप्रमाणे बेडची टंचाई नाही, ऑक्सिजन पुरवठाही पुरेसा आहे. बेडही रिकामे आहेत. बहुतांश खासगी रुग्णालयांत कोविडचे मोजकेच रुग्ण उपचार घेत आहेत. जे बाधित आहे, त्यातील मोठ्या संख्येने रुग्ण सरकारी हॉस्पिटलमध्ये आहेत. याचा अर्थ हे रोजचे जास्त मृत्यू १५ दिवसांपासून सरकारी रुग्णालयातच होतात का? हा प्रश्‍नही अनुत्तरित आहे.

खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडील मृत्यूंची संख्या अद्ययावत केलेली नाही. महापालिका आयुक्तांनी आजच खासगी रुग्णालयांना मृत्यूंची आकडेवारी अद्ययावत करण्याविषयी सूचना दिल्याचे समजते. महापालिका आयुक्तांकडून याविषयी माहिती उपलब्ध होऊ शकेल. -सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

शहरातील मृत्यूंच्या जुन्याच नोंदी आता अपडेट होत असाव्यात. त्यामुळे हा प्रकार दिसत असावा. हे मृत्यू आधीचेच असावेत, असा अंदाज आहे.

-डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक

corona death rate
लढाऊ वैमानिक प्रशिक्षणासाठी २ महिला अधिकाऱ्यांची निवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com