Nashik NMC : पुढील वर्षी पुन्हा उडणार पदोन्नतीचा बार; अधिकाऱ्यांची समिती गठित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC News

Nashik NMC : पुढील वर्षी पुन्हा उडणार पदोन्नतीचा बार; अधिकाऱ्यांची समिती गठित

नाशिक : महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी कर्मचारी निवड समितीचे गठण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध संवर्गातील रिक्त पदांवर पदोन्नतीने पदे भरण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे. पदोन्नतीची कारवाई सुरू करण्याच्या अनुषंगाने संबंधित संवर्गाची सेवाज्येष्ठता याद्या अद्ययावत असणे आवश्यक आहे. (decided to form staff selection committee to promote officers and employees of NMC Nashik News)

महापालिकेच्या आस्थापनेवरील तांत्रिक किंवा अ तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना २०२१ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात व कनिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना तदर्थ स्वरूपात पदोन्नत्या देण्यात आलेल्या आहेत. यात अग्निशमन विभागाला वगळण्यात आले. गट ‘अ’ ते गट ‘ड’मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय १ जानेवारी २०२१ व १ जानेवारी २०२२ ची स्थिती दर्शविणारी संवर्गनिहाय प्रारूप ज्येष्ठता याद्या २४ मार्चला प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. प्रारूप सेवाज्येष्ठता यादीवर सात एप्रिल २०२२ पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या.

सेवाज्येष्ठतेवर प्राप्त झालेले हरकतींवर सुनावणी होऊन त्यावर निर्णय देण्यात आला आहे. लेखा व लेखा परीक्षण विभाग, वैद्यकीय विभागातील अधिकारी व अभियांत्रिकी संवर्गातील कर्मचारी अभियंता व उपअभियंता हे संवर्ग वगळून इतर सर्व संवर्गाचे अंतिम सेवाज्येष्ठता यादी २९ ऑगस्ट २०२२ ला अंतिम करण्यात आली आहे. सेवाज्येष्ठता यादी अंतिम झाल्यानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी कर्मचारी निवड समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: Police Recruitment : पोलिस भरतीतील जाचक अटींमुळे अनेकांची संधी हुकणार!

निवड समितीचे कार्य

- महापालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदांपैकी पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदांचा संवर्गनिहाय आढावा.

- पदोन्नतीसाठी नाव निश्चित करताना मागील पाच वर्षाचा गोपनीय अहवाल विचारात घेणार.

- शास्ती न्यायालयात दाखल गुन्हे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, विभागीय चौकशी आढळून आल्यास पदोन्नती न देण्याचे धोरण.

अशी आहे निवड समिती

अतिरिक्त आयुक्त (शहर) हे निवड समितीचे अध्यक्ष आहेत, तर मुख्य लेखा परीक्षक बोधे किरण सोनकांबळे व कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे सदस्य आहेत. प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील सदस्य सचिव, तर संबंधित विभागाचे प्रमुख हे सदस्य आहेत.

हेही वाचा: D. Pharmacy Admission : डी. फार्मसीच्या अर्जाची मुदवाढ; 22 पर्यंत संधी

टॅग्स :NashikPromotion