Nashik News : NMCत करसल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Latest News

Nashik News : NMCत करसल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय!

नाशिक : महापालिकेच्या करा संबंधित कामकाज पाहण्यासाठी तीन वर्षांसाठी घर सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात महासभेत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. (Decision to appoint tax consultant in NMC Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: YIN Election 2022- 23 : ‘यिन’ची 115 महाविद्यालयांत निवडणूक; येथे करा अर्ज

सन २०१७ पासून महापालिकेत वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला आहे. या प्रणालीमध्ये वेळोवेळी बदल होत असल्याने कर संरचने संदर्भात कामांमध्ये देखील वारंवार बदल होतात. महापालिकेच्या सर्व विभागातून माहिती संकलित करून प्रणालीत भरावी लागते. त्याचबरोबर नवीन करा संदर्भात देखील कामे केली जाते वस्तू व सेवा कराचे विवरणपत्र भरणे आधी कामे देखील करावे लागतात.

मात्र यासाठी तज्ञ कर्मचारी उपलब्ध नाही त्यामुळे कर सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. सध्या ए.वाय.जी. असोसिएट्सच्या वतीने महापालिकेचे करा संदर्भात काम पाहिले जाते. त्यासाठी वार्षिक १४ लाख ३४ हजार ७६२ रुपये सर्व करांचा संबंधित संस्थेला अदा केले जातात. मार्च २०२३ रोजी या संस्थेची मदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे सन २०२५ व २६ पर्यंत नवीन संस्था नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

हेही वाचा: Dhule News : धुळ्यात नाताळमुळे चर्चमध्ये तयारीला वेग

टॅग्स :Nashiknmctax