वाढत्‍या थंडीने नाशिककरांना हुडहुडी! किमान तापमानात घसरण; गाठली नीचांकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

winter.jpg

काही दिवसांपासून वातावरणात सातत्‍याने घसरण होत असल्‍याने शहरासह जिल्‍हाभरात गारठा वाढला आहे. वाढत्‍या थंडीमुळे नाशिककरांना हुडहुडी भरली असून, सायंकाळी थंडीमुळे शहरातील रस्‍ते ओस पडत आहेत.

वाढत्‍या थंडीने नाशिककरांना हुडहुडी! किमान तापमानात घसरण; गाठली नीचांकी

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : काही दिवसांपासून वातावरणात सातत्‍याने घसरण होत असल्‍याने शहरासह जिल्‍हाभरात गारठा वाढला आहे. वाढत्‍या थंडीमुळे नाशिककरांना हुडहुडी भरली असून, सायंकाळी थंडीमुळे शहरातील रस्‍ते ओस पडत आहेत. बुधवारी (ता.११) नाशिकच्‍या किमान तापमानात घसरण होऊन १०.६ अंश सेल्सिअस इतकी नीचांकी गाठली आहे. 

वाढत्‍या थंडीमुळे नाशिककरांना हुडहुडी भरली
एकीकडे दीपोत्‍सवाने शहर उजळले असताना, दुसरीकडे गारठ्यामुळे बचावासाठी नागरीकांकडून स्‍वेटर, शाल व यासांरख्या साधनांचा वापर होत आहे. पहाटे कमालीचा गारठा जाणवत असल्‍याने पहिल्‍या प्रहरीला फिरण्यासाठी, व्‍यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची चांगलीच परीक्षा घेतली जात आहे. काही दिवसांपासून तापमानात कमालीची घट होत असून, कमाल व किमान तापमानातील तफावतदेखील कमी होत आहे. बुधवारी (ता.११) नाशिकचे किमान तापमान १०.६ अंश सेल्सिअस असताना, कमाल तापमानात २७.८ अंश सेल्सिअस अशी नोंद घेतली आहे.

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

येत्‍या काही दिवसांत पारा आणखी घसरण्याची चिन्‍हे आहेत. दरम्‍यान, सध्याच नाशिककरांना हुडहुडी भरली असून, येणाऱ्या काही दिवसांत थंडीमुळे शेकोट्यांच्‍या प्रमाणातही वाढ होणार आहे. शहरी भागात कमालीचा गारठा असताना, ग्रामीण भागात सायंकाळनंतर थंडीमुळे शुकशुकाट बघायला मिळत आहे. तर मळ्यांमध्ये, अंगणाबाहेर पेटवलेल्‍या शेकोटीतून गारव्‍यापासून काहीसा दिलासा मिळत आहे.  

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

loading image
go to top