उत्तर महाराष्ट्रावर अपुऱ्या पावसामुळे चिंतेचे ढग

Farmers
Farmersesakal

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार या चार जिल्ह्यांसाठी यंदा पावसाच्या अनुषंगाने ‘Bad News’ आहे. ऐन पावसाळ्यात पाण्याच्या उपलब्धतेविषयी चिंतेचे ढग तयार झालेत. आतापर्यंत पावसाने हुलकावणी दिली असताना आगामी काळात हवामान अभ्यासक अपेक्षित पावसाबद्दल साशंक आहेत. सद्यस्थितीत सर्वसाधारणपणे ६८.५५ टक्के पर्जन्यमान झाले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये जलसाठा २० टक्क्यांनी कमी झाला आहे. शिवाय अपूऱ्या पावसामुळे खरिपाच्या पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम झाल्याने सध्यस्थितीत उत्पादनात १५ टक्क्यांची घट दिसू लागली आहे.

राज्यात वळवाच्या पावसाचा हवामानशास्त्र अभ्यासकांचा अंदाज

हवामानशास्त्र अभ्यासकांच्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यात २ ते १० सप्टेंबरला वळवाचा पाऊस शक्य आहे. त्यानंतर २४ सप्टेंबरपर्यंत पावसाचा खंड पडणार आहे. त्यानंतर २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज असला, तरीही अपुऱ्या पावसाची कसर हा पाऊस कितपत भरुन काढणार याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह कायम आहे. पुढे ५ ते १० ऑक्टोंबरला संपूर्ण राज्यात वळवाच्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र अभ्यासकांचा आहे. १५ ऑक्टोंबरनंतरच्या परतीच्या पावसाचा ठोकताळा बांधण्यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, राज्यातील जुलैमधील पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमध्ये १३ ऑगस्टपर्यंत भात, नागली, सोयाबीन, ज्वारी, मका, ऊस, कापूस, हळद, तूर, मूग, उडीद, आंबा, संत्री, मोसंबी, लिंबू, सुपारीसह भाजीपाला क्षेत्राचे ४ लाख ६८ हजार १८१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. राज्यातील एक कोटी ४१ लाख ९८ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ऊस वगळून १ कोटी ३९ लाख ४९ हजार हेक्टरवर म्हणजेच, खरिपाच्या ९८ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

कीड-अळींनी नुकसानीत भर

उत्तर महाराष्ट्रातील खरिपाच्या सर्वसाधारण २१ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १९ लाख ६१ हजार म्हणजेच, ९२.५४ टक्के क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत. ज्वारी, बाजरी, मका, भूईमूग, सूर्यफूल, तूर, तीळ, कारळे हे वाढीच्या अवस्थेत आहेत. मूग, उडीद फुलोरा ते शेंगा लागण्याच्या, भूईमूग फुलोऱ्याच्या, सोयाबीन वाढ ते फुलोरा, कापूस फुलोरा ते बोंड लागण्याच्या अवस्थेत आहेत. अगोदरच अपुऱ्या पावसामुळे खरिपाच्या उत्पादनातील घटीची चिन्हे दिसत असताना कीड-अळीमुळे नुकसानीत भर पडणार आहे. मका, सोयाबीन, कापसावर कीड-अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात आतापर्यंत ८०.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी राज्यात १०९.७ टक्के पाऊस झाला होता. शिवाय राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लघू अशा एकुण ३ हजार २६७ प्रकल्पांमधील जलसाठा ५९.२३ टक्के झाला असून, गेल्यावर्षी हाच साठा ७२.५९ टक्के होता. उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्याची स्थिती नाजूक बनली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये आतापर्यंत अवघा ६३ टक्के साठा झाला आहे. गेल्यावर्षी ७२ टक्के जलसाठा झाला होता. नाशिक जिल्ह्यातील या स्थिती झळा मराठवाड्याला बसण्याची शक्यता बळावली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील पावसाची स्थिती (टक्के)

जिल्हा आतापर्यंतचा पाऊस गेल्यावर्षीचा पाऊस -

नाशिक ६९.९ ८७.१

धुळे ८२.२ १४१.१

नंदूरबार ४०.३ ७१

जळगाव ८१.८ १४३.७

Farmers
टोमॅटोची उतरली लाली! केवळ 3 ते 5 रुपये किलोच भाव?

विभागनिहाय जलसाठा (टक्क्यांमध्ये)

विभाग प्रकल्प संख्या आताचा साठा गेल्यावर्षीचा साठा -

अमरावती ४४६ ५६.४ ६९.४३

औरंगाबाद ९६४ ३९.८९ ५८.७९

कोकण १७६ ७७.३२ ८१.३३

नागपूर ३८४ ४७.३९ ७१.१७

नाशिक ५७१ ४७.८९ ६७.८७

पुणे ७२६ ७३.२५ ८०.०४

Farmers
राणेंविरोधात अटकेचे आदेश कायदेशीरच : नाशिक पोलीस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com