टोमॅटोची उतरली लाली! केवळ 3 ते 5 रुपये किलोच भाव?

tomatoes
tomatoesesakal

लासलगाव (जि.नाशिक) : कांद्याची नगरी (onion) असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार (lasalgaon agricultural market) समितीत टोमॅटो दराची (tomato price) लाली उतरली आहे. टोमॅटो उत्पादकांना दिलासा देण्यासाठी विदेशात टोमॅटोची जास्त निर्यात कशी करता येईल, यासाठी सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (dr.bharati pawar) यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरावर

नाशिक, नगर, पुणे, औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यात, तसेच राजस्थान, बेंगळुरू आणि गुजरात या ठिकाणी प्रामुख्याने स्थानिक टोमॅटोची मोठी आवक होत आहे. टोमॅटो उत्पादनाच्या तुलनेत देशांतर्गत मागणी कमी आहे. तसेच, तीन वर्षांपासून पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरावर होत आहे. लासलगावमध्ये ३० हजार ५०० क्रेट्स आवक झाली असताना तीन ते पाच रुपये प्रतिकिलो दर टोमॅटोला मिळाला. त्यामुळे टोमॅटो उत्पादक हवालदिल झाला आहे. पिंपळगाव बसवंत, वणी, चांदवड आणि येवला बाजार समितीत टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेट्सला ६० ते शंभर रुपयांपर्यंत म्हणजे तीन ते पाच रुपये किलो इतका बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

वाहतूक, मार्केटमधील चढ-उतार, शेतातून तोडणीचा खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त टोमॅटोची निर्यात इतर राज्यांसह विदेशात कशी वाढवता येईल, यासाठी टोमॅटो निर्यातदार व्यापाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीकडे मागणी केली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या टोमॅटो उत्पादकांना दिलासा देण्यासाठी पाकिस्तान, बांगलादेशसह आखाती देशात टोमॅटो कसा जास्त निर्यात करता येईल, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला आहे. -सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती

tomatoes
नाशिक पोलिस आयुक्तांकडून राणेंवर कारवाईचे आश्वासन - बडगुजर

वाहतूक खर्चही फिटेना

यावर्षी पाऊस कमी असल्याने टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. मरळगोई येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी योगेश फापाळे यांनी अर्धा एकर टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. ६० ते ७० हजार रुपये आतापर्यंत खर्च झाला असून, टोमॅटोचे उत्पादन सुरू झाले आहे. लासलगाव बाजार समितीत १२५ क्रेट्समधून टोमॅटो विक्रीसाठी आणले असता शंभर रुपये इतका दर एका क्रेट्सला मिळाला. हा दर न परवडणारा असल्याचे त्यांनी सांगितले. टोमॅटो तोडणी आणि वाहतूक खर्चाचा विचार केला तर ४० ते ५० रुपये इतका खर्च एका क्रेट्सला येत असल्याने उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.

tomatoes
महिला तलाठी विनयभंग प्रकरण : तात्पुरत्या बदलीला स्थगिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com