Deepak Kesarkar: मी शिर्डीत प्रार्थना केली अन्‌ कोल्‍हापूरची पूरस्थिती टळली! केसरकर यांचा दावा

Deepak Kesarkar
Deepak Kesarkaresakal

Deepak Kesarkar : ‘अंधश्रद्धा म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, कोल्हापुरात पूर परिस्थितीप्रसंगी मी शिर्डीत होतो. राधानगरी धरणातून पाणी सोडले असताना पाणीपातळीत पाच फुटांपर्यंत वाढ होऊन अनेक गावे पाण्याखाली आली असती.

पण, मी प्रार्थना सुरू ठेवली, एक फुटानेही पाणीपातळीत वाढ झाली नाही, असा अजब दावा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी (ता. ३०) केला. वाटल्यास तुम्‍ही पाटबंधारे विभागाकडे चौकशी करा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. (Deepak Kesarkar claiming statement on kolhapur flood nashik news)

शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीसाठी ते आज येथे आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. नाशिकला दाखल होण्यापूर्वी शिर्डीत व नंतर सिन्नर येथील मंदिरात त्यांनी प्रार्थना केल्‍याने यासंदर्भात प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते.

संभाजी भिडे यांच्‍या वादग्रस्‍त विधानाबाबत श्री. केसरकर म्‍हणाले, की त्‍यांचे वक्‍तव्‍य हे वयोमानाचा परिणाम आहे.

गड-किल्‍यांसंदर्भात ते काम करतात, तर त्‍यांनी तेच काम करावे. राजकीय भाष्य करणे बंद करायला हवे. त्‍यांची भेट झाल्‍यास त्‍यांना तसे सांगणार आहे. राष्ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍याबाबत त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याने केवळ राज्‍याला नव्हे, तर देशाला दुःख झाले आहे.

ठाकरेंनी टीका नव्‍हे, कौतुक करावे

उद्धव ठाकरे यांच्‍याकडून होत असलेल्‍या टीकेबाबत श्री. केसरकर म्‍हणाले, की सत्ता व पद गेल्‍याचा त्‍यांना राग आलेला असावा. बाळासाहेब ठाकरे यांनीही समाजकारण व राजकारणाचे सूत्र सांगितले होते.

शंभर टक्‍के राजकारण त्‍यांनाही मान्‍य नव्‍हते; परंतु उद्धव ठाकरे यांच्‍या वक्‍तव्‍यावर प्रतिक्रिया दिल्‍यास त्‍यांना अपमानास्‍पद वाटते. त्‍यापेक्षा त्‍यांनी टीका करणे थांबवावे. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या रूपाने शिवसैनिक घेत असलेल्‍या मेहनतीचे त्‍यांनी कौतुक केले पाहिजे, असे ते म्‍हणाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar: दीपक केसरकर यांना धमकी, खंडणी मागण्याचा प्रयत्न

मोदींचा करिष्मा चालणार

लोकसभा निवडणुकीच्‍या सर्वेक्षणाविषयी ते म्‍हणाले, की मोदींचा करिष्मा यंदाही नक्‍की चालेल. त्‍यांच्‍या नेतृत्‍वामुळे २० देशांमध्ये आज व्‍यवहारासाठी रुपयाचे चलन ग्राह्य धरले जाते आहे.

गेल्‍या नऊ वर्षांमध्ये पायाभूत सुविधा, वैद्यकीय शिक्षणासह अन्‍य पातळ्यांवर मोदींनी भरीव कामगिरी केली असल्‍याचे श्री. केसरकर म्‍हणाले. जे देशहिताचा विचार करीत नाहीत ते कौरवच, अशी टीका त्‍यांनी केली.

मंत्री केसरकर म्‍हणाले...

- संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे, हे तपासावे लागेल

- नाशिक- मुंबई महामार्गावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू

- रस्ते काँक्रिटीकरणावर भर, खड्डे होतील इतिहासजमा

- रस्‍ते दुरुस्‍तीतून भ्रष्टाचार करणारेही होतील इतिहासजमा

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar : B.Ed., D.Ed धारकांसाठी आनंदाची बातमी! शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com