नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच मराठी माणसाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना नाशिक मनसेकडून मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे. शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी मराठी जनतेची माफी मागण्याबरोबरच वादग्रस्त व्हिडिओ सात दिवसांत सोशल मीडियावरून हटवावा अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.