Latest Marathi News | विवाहित प्रेयसीची बदनामी; संशयिताला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Defamation case

Crime Update : विवाहित प्रेयसीची बदनामी; संशयिताला अटक

नाशिक : प्रेमसंबंध तोडून विवाह केलेल्या प्रियसीने पुन्हा प्रेमसंबंध ठेवावेत, यासाठी संशयिताने बदनामी करणारे फोटो सोशल मीडियाद्वारे तिच्या पतीला पाठविले. घनश्‍याम दशरथ चौधरी (३०, रा. चाळीसगाव, जि. जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. (Defamation of married girlfriend Suspect arrested Nashik crime Latest Marathi News)

हेही वाचा: Crime Update : गंगापूर रोडवर रंगला सराफाच्या कर्मचाऱ्यांना लुटण्याचा थरार

पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, विवाहपूर्वी संशयित चौधरी याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडून पीडितेने विवाह केला. त्यामुळे संशयिताने पीडितेवर नाराज होत पतीला सोडून परत प्रेमसंबंधात राहण्यासाठी मोबाईलद्वारे वेळोवेळी संपर्क साधत होता.

मात्र, पीडितेचा नकार असल्याने संशयिताने पीडितेसमवेतचे फोटो, व्हिडिओ, कॉल रेकॉर्डिंग पीडितेच्या पतीला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवून पीडितेची बदनामी करून विनयभंग केला. याबाबत संशयिताविरोधात इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, संशयित चौधरीला चाळीसगावातून अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद तपास करीत आहेत.

हेही वाचा: Navratrotsav 2022 : महामार्ग ते गडकरी सिग्नल मार्गावरील वाहतूक मार्गात बदल