लखमापूर: स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटली, पण अजूनही अनेक गावं मूलभूत सुविधांच्या पायरीवर उभी आहेत. आज रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल आणि समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनांच्या ढोल-ताशांत देश न्हाऊन निघतोय, पण देहेरेवाडीसारख्या गावात अजूनही साधा पक्का रस्ता नाही. यामुळे विद्यार्थ्यांपासून रुग्णांपर्यंत सर्वांना रोज जिवाशी खेळ करून प्रवास करावा लागतो. याच अन्यायकारक वास्तवाचा थरारक अनुभव अनिता गणेश जाधव या गर्भवती महिलेला घ्यावा लागला.