Nashik News: केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रियेत दिरंगाई! जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षकांचे गुरुवारी उपोषण

hunger strike
hunger strikeesakal

सिन्नर : नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात केंद्रप्रमुखांची २४४ पैकी जवळपास २२० पदे रिक्त असून, गेल्या आठ वर्षांपासून पदोन्नती झालेली नाही.

ही पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, यासाठी केंद्रप्रमुख कृती समितीतर्फे गुरुवारी (ता. २१) जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. (Delay in Center Head Promotion Process Primary teachers hunger strike in front of Zilla Parishad on Thursday Nashik News)

केंद्रप्रमुखांच्या नियुक्त्या रखडल्यामुळे पर्यवेक्षीय यंत्रणेसोबतच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. १ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार ५० टक्के पदे पदोन्नतीने भरण्यास सांगितली आहेत.

ती पदवीधर शिक्षक, पदवीधर मुख्याध्यापक यांच्यातून सेवा ज्येष्ठतेनुसार भरली जातात. नाशिक जिल्हा परिषदेने पदोन्नती प्रक्रिया सुरू करून चार महिने उलटली, तरी पूर्ण केलेली नाही.

शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात, तसेच रत्नागिरीसह इतर जिल्ह्यांतील पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. नाशिक शिक्षण विभागाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे अजून किती महिने लागतील, हे निश्चित कुणी सांगू शकत नाही.

hunger strike
Nashik: श्री स्वामी सेवा मार्गातर्फे दत्तजयंतीनिमित्त अखंड नाम जप; 20 ते 27 डिसेंबरदरम्यान केंद्रामध्ये विविध कार्यक्रम

वास्तविक १५ दिवसांत पूर्ण होणारी ही प्रक्रिया अनेक महिने उलटले, तरी पूर्ण होत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यानच्या कालावधीत अनेक पदोन्नतीपात्र शिक्षक विनापदोन्नती आहेत.

त्याच पदावर निवृत्त झाले आहेत. प्रशासनाने त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधून पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, यासाठी केंद्रप्रमुख कृती समितीतर्फे गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत लेखी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाीयांना देण्यात आले आहे.

पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण न केल्यास बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे केंद्रप्रमुख संघर्ष कृती समितीतर्फे सांगण्यात आले. भाऊसाहेब निकम , संजीव बोरसे, राजेंद्र कुशारे, राजेंद्र निकुंभ, पी. के. आहिरे, विजय निकम, चंद्रशेखर दंडगव्हाळ आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

hunger strike
Champa Shashthi Festival: नांदूरवैद्यचा अश्व जोपासतोय जेजुरी वारीची परंपरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com