येवला- अवर्षणप्रवण असलेल्या येवल्यात पावसाच्या पाण्यावर आठमाही हंगाम साधला जातो. मात्र, रब्बीसह उन्हाळी पिकांसाठी पालखेड डाव्या कालव्याचे दोन आवर्तनेच लाखमोलाचे असतात. पण, यंदा पालखेड डावा कालवा प्रशासनाने सुमारे १५ दिवस उशिरा आवर्तन सोडल्याने लाभक्षेत्रातील शेकडो हेक्टरवरील पिके करपली आहेत. नियोजनाच्या अभावाचा हा फटका असून, शासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांना फटका बसला. पालखेड प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.