Nashik News : ‘डिलिव्हरी बॉय’ झाले स्वयंघोषित मेकॅनिक; पैशांची मागणी करुन ग्राहकांची लूटमार

 Gas cylinder
Gas cylinderesakal

Nashik News : प्रत्येक पाच वर्षांनी गृहोपयोगी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या घरातील गॅसचे इन्स्पेक्शन केले जाते. यासाठी सध्या २३६ रुपये आकारण्यात येत आहे.

तज्ज्ञ मेकॅनिकने घरातील गॅसची सेफ्टी चेक करायला हवी, मात्र सध्या सिलिंडर घरापर्यंत पोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉय सिलिंडरची सेफ्टी चेक करून चक्क ग्राहकांकडून २३६ रुपयांची लूटमार करीत आहे.

उपनगराच्या आसपास असणाऱ्या ग्राहकांना एका गॅस एजन्सीचा अजब प्रकार पाहायला मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (delivery boy is taking money from customer for checking safety of cylinder nashik news)

भारत पेट्रोलियम कंपनीने सध्या घरातील सिलिंडरची सेफ्टी चेक करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. तशा आशयाचे पत्र गॅस एजन्सीला दिले आहे.

ही फायर सेफ्टी तपासताना येथील प्रशिक्षित मेकॅनिकने घरातील गॅसची फायर सेफ्टी चेक करणे गरजेचे आहे. मात्र सध्या सिलिंडर गाडीवरील डिलिव्हरी बॉय लोकांच्या घरातील फायर सेफ्टी चेक करीत आहे.

केवळ निरीक्षण करून तुमचे कनेक्शन ओके आहे, २३६ रुपये द्या असे फर्मान सोडत आहे. यातून ग्राहकांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे वास्तविक पाहता फायर सेफ्टी व सिलिंडरची सुरक्षितता चेक करण्यासाठी मेकॅनिकने इन्स्पेक्शन करणे गरजेचे आहे. मात्र डिलिव्हरी बॉय मेकॅनिक झाल्यामुळे अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Gas cylinder
Nashik News : खुशखबर! आता रेशनकार्डधारकांना मिळणार जिल्ह्यातील रुग्णालयात मोफत उपचार; जाणून घ्या सविस्तर...

या संदर्भात अनेक नागरिकांनी ‘सकाळ’ कडे डिलिव्हरी बॉय मेकॅनिक झाल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. या संदर्भात गॅस एजन्सीच्या मालकांनी यात सुधारणा केली नाही तर आंदोलन करू, असा इशारा विविध राजकीय पक्षांसह ग्राहक संघटनेने दिला आहे.

"प्रत्येक पाच वर्षांनी सिलिंडरची टाकीची नळीची सेफ्टी चेक करणे गरजेचे आहे. या संदर्भात प्रशिक्षित मेकॅनिकने ही सुरक्षा चेक करणे गरजेचे आहे. डिलिव्हरी बॉय जर सेफ्टी चेक करत असेल, तर त्याची आम्ही चौकशी करू आणि कारवाई करू. ग्राहकांनी या संदर्भात जागरूक राहणे आवश्यक आहे." - मौलिक कपाडिया, अधिकारी, भारत पेट्रोलियम

 Gas cylinder
Nashik News : कौशल्‍य मागणी सर्वेक्षण सहभागासाठी सोमवारपर्यंत मुदत; यावर करा नोंदणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com