महामार्गाच्या कामांचा डीपीआर द्या

महामार्गाच्या कामांचा डीपीआर द्या
Published on: 
महामार्गाच्या कामांचा डीपीआर द्या नगरसेवक अमर जैन यांचे जिल्हाधिकारी, ‘न्हाई’ ला निवेदन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत सुरू असलेल्या विकासकामांचे नेमके स्वरूप, नियोजन आणि भविष्यातील सुविधांची माहिती जाणून घेण्यासाठी नगरसेवक अमर जैन यांनी निवदेनाद्वारे मागणी केली आहे. यात मानराज पार्क ते खोटेनगरदरम्यान सुरू असलेल्या विविध कामांचा मंजूर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात मंगळवारी (ता. ३) त्यांनी निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी यांच्या कक्षात झालेल्या चर्चेवेळी प्रांताधिकारी, महापालिका आयुक्त आणि नगरसेवक नरेंद्र पाटील उपस्थित होते. यात मानराज पार्क ते खोटेनगरदरम्यान महामार्गालगत उड्डाणपुलाच्या परिसरात सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण, गटारींचे बांधकाम आणि अन्य विकासकामे सुरू आहेत. मात्र, या कामांचे नियोजन नेमके कसे आहे, कोणत्या सुविधा प्रस्तावित आहेत आणि त्यांची तांत्रिक रचना काय आहे, याची माहिती लोकप्रतिनिधींना उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे जैन यांनी निवेदनात म्हटले आहे. माहिती मागितली मंजूर डीपीआरसोबतच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे नियोजन, गटारींची रचना, पाण्याचा निचरा, महामार्गालगत प्रस्तावित ग्रीन झोन, जोडरस्ते आणि सिग्नल व्यवस्थेच्या तरतुदींचे तपशीलही देण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकट समन्वयासाठी ‘डीपीआर’ महत्त्वाचा निवेदनात जैन यांनी म्हतले आहे, की प्रभाग क्रमांक ८ मधून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर परिसरातील विकासकामांवर देखरेख ठेवणे आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने त्यांचा पाठपुरावा करणे ही आपली जबाबदारी आहे. कामांमध्ये समन्वयाचा अभाव राहू नये, भविष्यात वाहतूक, पाणी निचरा किंवा अन्य नागरी समस्यांना तोंड द्यावे लागू नये, यासाठी मंजूर आराखड्याची माहिती मिळणे गरजेचे असल्याचे निवेदनातून स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.