Kharif Season : खरीप हंगामासाठी 1 लाख क्विंटल बियाण्यांची मागणी

नाशिक जिल्ह्यासाठी २ लाख २२ हजार मेट्रिक टन खतसाठा मंजूर
Farmer
Farmeresakal

Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सर्व बी-बियाणे रासायनिक खते व औषधे वेळेवर व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावीत. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.

कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी एकूण १ लाख १ हजार ४७४ क्विंटल बियाण्यांची तर २ लाख २२ हजार ८६० मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे. (Demand for 1 lakh quintal seeds for Kharif season 2 lakh 22 thousand metric tons of fertilizer stock approved for Nashik district)

जिल्ह्यात रब्बी हंगाम आटोपला असल्याने खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. गतवर्षी ६ लाख २८ हजार ३३ हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदा यात वाढ झाली असून, ६ लाख २६ हजार ८७३ हेक्टर क्षेत्र खरिपासाठी निश्चित केले आहे.

यासाठी एक लाख एक हजार ४७४ क्विंटल बियाण्यांची (यात १४ हजार ९६६६ सार्वजनिक व ८६ हजार ५०८ खासगी) मागणी नोंदविली आहे. या शिवाय ९ हजार ८५१ क्विंटल महाबीजमार्फत बियाणे मागणी केली आहे.

हंगामासाठी २ लाख ६० हजार मेट्रिक टन खत साठयांची मागणी नोंदविली होती. त्यातून एकूण २ लाख २२ हजार ८६० मेट्रिक टन कोटा मंजूर झाला आहे. एप्रिल अखेर यातील २८ हजार ९७२ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध होणे अपेक्षित होते.

परंतु, यातील १८ हजार ९६२ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध झालेला आहे. गतवर्षीचा ९९ हजार ९३८ मेट्रिक टन खतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक लाख २५ हजार ५५५ मेट्रिक टन खतसाठा शिल्लक आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Farmer
Gram Sevak Award : 5 वर्षांपासून रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे सोमवारी वितरण

जिल्ह्यासाठी आवश्यक असणारी खते आणि बियाणे यांचा पुरवठा उत्पादक कंपन्यांनी वेळेवर करावा. तसेच शेतकऱ्यांनी खतांची खरेदी एकदाच न करता आवश्यकतेप्रमाणे करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांकडून युरियाची मोठी मागणी

शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याअनुषंगाने एक लाख मॅट्रिक टन युरिया खताची मागणी केली असून, त्यातून ८९ हजार १७० मेट्रिक टन मंजूर झाले आहे. त्यातून ८ हजार पाच मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. २४ हजार ५१७ मेट्रिक टन खतसाठा शिल्लक होता.

"जिल्ह्यात कपाशी बियाणे एक जूनपासून पेरणीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदीची घाई करू नये. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषिनिविष्ठा केंद्रातूनच खते व बियाणे खरेदी करावीत. खरेदी केलेली बिले जपून ठेवावी."

- अभिजित जमदाडे, जिल्हा मोहीम अधिकारी कृषी विभाग, जिल्हा परिषद

Farmer
Nashik News: बदल्यांसाठी आदिवासी तालुक्यांतील कर्मचारी एकटविले; ZPकडून सोईचा अर्थ-विभागीय आयुक्तांना पत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com